परभणी अवैध वाळू

परभणीत पहाटे अवैध वाळू वाहतुकीवर धाड, तर घरझडतीत प्रतिबंधित गुटखा जप्त!

Parbhani illegal sand: परभणीतील पाथरी येथे पोलीसांनी अवैध वाळू वाहतुकीवर व गुटखा जप्तीवर धाडीची कारवाई केली. टिप्पर जप्त व दुसऱ्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा जप्त केला.

परभणीत पहाटे अवैध वाळू वाहतुकीवर धाड, तर घरझडतीत प्रतिबंधित गुटखा जप्त!

Parbhani illegal sand

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या पाथरीत दोन वेगवेगळ्या कारवाया

परभणी (Parbhani illegal sand) :  पाथरी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथरी शहरात शनिवारी  अवैध धंद्यांविरोधात दोन वेगवेगळ्या कारवाया करत अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त केला तर दुसऱ्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिवार ९ मे रोजी शहरात पेट्रोलिंग करत असताना पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या दरम्यान माजलगावकडून येणाऱ्या रस्त्यावर हर्षवर्धन पेट्रोल पंपाजवळ अवैध वाळूने भरलेला टिप्पर आढळून आला. याप्रकरणी टिप्पर चालक व मालक चंद्रसिंग नाईक (रा. माळीवाडा, पाथरी) याच्याविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात
पोलीस हवालदार विलास नारायण सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अवैध व चोरटी वाळू वाहतूक, पर्यावरण संरक्षण कायदा तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सकाळी सुमारे ९.३० वाजता हयातनगर परिसरातील समशोद्दीन तांबोळी यांच्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अंदाजे १५ हजार रुपये किमतीचा डायरेक्टर गुटखा आढळून आला. पोलिसांनी सदर गुटखा जप्त करून समशोद्दीन तांबोळी व आजमुद्दीन तांबोळी (दोघे रा. हयातनगर पाथरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या (Parbhani illegal sand) प्रकरणी पोलीस अंमलदार मधुकर ढवळे यांनी फिर्याद दिली आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस अंमलदार विलास सातपुते, फड, घोंगडे, ढवळे, चव्हाण व शेख रफीयोदिन यांच्या पथकाने केली आहे.

संबंधित सामग्री

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026
परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

Parbhani Rigorous Imprisonment: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे बोलणार्‍या आरोपीस जिल्हा न्यायाधीश -१, जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाखेड जि.पी.बावस्कार दोन वर्ष सश्रम कारावास..

Sep 29, 2026