औंढा नागनाथ (Illegal sand transportation) : तालुक्यातील शिरला ते पुरजळ जाणाऱ्या रोडवर पूरजळ गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाहनावर औंढा नागनाथ महसूल पथकाने दिनांक 3 सप्टेंबर रोजी कारवाई करून ट्रॅक्टर वाहनासह वाळू असा सहा लाख 5 हजार 250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत एकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळूची वाहतूक रोखण्यासाठी महसूल पथक नेमण्यात आले असून, या पथकाने 3 सप्टेंबर रोजी तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरला ते पुरजळ रोडवर सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारे विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर वाहन येताच चालकाकडे परवण्यासंदर्भाने विचारपूस केली.
त्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने महसूल पथकाने ट्रॅक्टर हेड ज्याची किंमत पाच लाख रुपये, ट्रॅक्टर ट्रॉली किंमत एक लाख रुपये, व त्यामधील (Illegal sand transportation) वाळू पाच हजार दोनशे पन्नास रुपये असा सहा लाख 5 हजार 250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत मंडळ अधिकारी अर्चना पटवे यांच्या फिर्यादीवरून चालक व मालक असलेले आदिनाथ वाघ यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास जमादार दिलीप नाईक करत आहेत. कारवाई अनिता पटवे, निलेश ठाकरे, संगमेश्वर सोनटक्के, प्रवीण ढेरे, सुरेश दुबे यांच्या पथकाने केली.