Illegal Sand Mining

परभणीत रात्रगस्तीत दोन टिप्परसह १४ लाखांचा वाळूसाठा जप्त

जिंतूर तालुक्यातील इटोली शिवारातील मसोबा पॉइंट परिसरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर जिंतूर पोलिसांनी शनिवारी (२७ जून) रात्री कारवाई केली.

परभणीत रात्रगस्तीत दोन टिप्परसह १४ लाखांचा वाळूसाठा जप्त

Illegal Sand Mining

इटोली शिवारात एसपी पथकाची कारवाई; जिंतूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा

परभणी (Illegal Sand Mining) : जिंतूर तालुक्यातील इटोली शिवारातील मसोबा पॉइंट परिसरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर जिंतूर पोलिसांनी शनिवारी (२७ जून) रात्री कारवाई केली. या कारवाईत सुमारे १४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्र्य गुंगाणे हे रात्री गस्त घालत असताना इटोली बसस्थानक येथे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट झाली. त्याचवेळी गुप्त बातमीदारामार्फत मसोबा पॉइंट परिसरातून दोन टिप्पर वाळू भरून येत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे दोन्ही पथकांनी संयुक्तपणे मसोबा मंदिरासमोर सापळा रचला. रात्री सुमारे ११.३५ वाजण्याच्या सुमारास दोन टिप्पर येताना दिसताच पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान दोन्ही टिप्परमध्ये वाळू आढळून आली. चालकांकडे वाळू वाहतुकीचा वैध परवाना मागितला असता तो नसल्याचे त्यांनी सांगितले.

एमएच-२२-एएन-५६८८ क्रमांकाच्या टिप्परचा चालक सोपान भगवान कुटे (वय २२, रा. कौवसडी, ता. जिंतूर) याने वाहन मालक नवनाथ शहाजी डोंबे (रा. बलसा, ता. जिंतूर) असल्याचे सांगितले. तसेच एमएच-२१-बीजी-४०१८ क्रमांकाच्या टिप्परचा चालक आश्रोबा गणपत गडदे (वय ४२, रा. निलज, ता. जिंतूर) याने वाहन मालक मनोहर पुंजाराम घुगे (रा. इटोली) असल्याची माहिती दिली. दोन्ही चालकांनी ही वाळू पूर्णा नदीपात्रातील मसोबा पॉइंट येथून आणल्याचे पोलिसांना सांगितले.

या कारवाईत दोन टिप्पर आणि त्यामधील तीन ब्रास वाळूसह एकूण सुमारे १४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्र्य गुंगाणे यांच्या फिर्यादीवरून चालक सोपान भगवान कुटे, आश्रोबा गणपत गडदे तसेच वाहन मालक नवनाथ शहाजी डोंबे आणि मनोहर पुंजाराम घुगे यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक टर्वे, पोलीस हवालदार वाघमारे, चुडावकर, ताटीकोंडलवार, इरशाद तसेच विशेष पथकाने संयुक्तपणे केली. या प्रकरणाचा पुढील तपास जिंतूर पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026