अवैध गोवंश हत्या

कुपटा येथे गोवंशाची अवैध हत्या; विश्व हिंदू परिषद आक्रमक

Illegal cattle slaughter: कुपटा येथे गोवंशाची अवैध हत्या करून अवशेष फेकले गेले. विश्व हिंदू परिषदेने ठाणेदारांना कठोर कारवाई करण्याची मागणी केली. गोवंश तस्करी, अवैध कत्तल

कुपटा येथे गोवंशाची अवैध हत्या; विश्व हिंदू परिषद आक्रमक

Illegal cattle slaughter


आरोपींवर कठोर कारवाईची मागणी, ठाणेदार यांना निवेदन

मानोरा (Illegal cattle slaughter) : मानोरा तालुक्यातील कुपटा येथे दि. ३० मे २०२६ रोजी गोवंशाची अवैध हत्या करून अवशेष फेकण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याप्रकरणी विश्व हिंदू परिषद - बजरंग दल, मानोरा प्रखंडच्या वतीने ठाणेदार नैना पोहेकर यांना दि. ४ जून रोजी निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुपटा येथे गोवंशाची अवैध हत्या (Illegal cattle slaughter) करून त्याचे अवशेष फेकण्यात आले. ही अत्यंत गंभीर व संतापजनक घटना आहे. सदर प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करून घटनेत सहभागी असलेल्या सर्व दोषींना शोधून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. मानोरा तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी, अवैध कत्तल व गोमांस वाहतुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा घटनांमुळे समाजातील विविध घटकांच्या भावना दुखावल्या जात असून सामाजिक सलोखा व शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

त्यामुळे सदर प्रकरणासह तालुक्यात सुरू असलेल्या गोवंश तस्करी, अवैध कत्तल (Illegal cattle slaughter) व गोमांस वाहतुकीची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करावेत व कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा समाज विघातक कृत्यांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. निवेदन देतेवेळी पदाधिकारी राम हेडा, करण ठाकुर, मनोज डांबरे, क्रिस राठोड, सचिन पडघान, वेदांत तिवारी, अनुपम पद्मगीरवार, विवेक रत्नपारखी, सचिन काळे आदीसह इतरांची उपस्थिती होती.

संबंधित सामग्री

गणेशोत्सव, श्री गणेशावरील वक्तव्य भोवले; विद्यानंद बापट यांना ४८ तासांचा अल्टिमेटम

गणेशोत्सव, श्री गणेशावरील वक्तव्य भोवले; विद्यानंद बापट यांना ४८ तासांचा अल्टिमेटम

गणेशोत्सव आणि भगवान श्री गणेश यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत ॲड. प्रदीप नाईक यांनी विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

Sep 10, 2026
'देशाचे दुर्दैव! स्वातंत्र्याला ८० वर्षे झाली तरी गोहत्या बंद झाली नाही': प. पू. गोपालानंद सरस्वतीजी महाराज 

'देशाचे दुर्दैव! स्वातंत्र्याला ८० वर्षे झाली तरी गोहत्या बंद झाली नाही': प. पू. गोपालानंद सरस्वतीजी महाराज 

Gopalananda Saraswatiji Maharaj: देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली, तरी संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा कायदा लागू झालेला नाही, ही देशासाठी दुर्दैवाची बाब आहे. पूर्वीच्या काळात दहा लोकांमागे...

Aug 30, 2026
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे डांबरीकरण महिनाभरातच उखडले..

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे डांबरीकरण महिनाभरातच उखडले..

PM Gram Sadak Yojana: अतिसंवेदनशील आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर अतिदुर्गम भागात वसलेल्या कोरची तालुक्यात कोट्यावधी किंमतीचे दोन पुल तसेच पुल वजा बंधारा वाहुन

Aug 14, 2026
कोटगुलमधील आदिवासींच्या गंभीर प्रश्नांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक

कोटगुलमधील आदिवासींच्या गंभीर प्रश्नांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक

BJP Yuva Morcha: नगरपरिषद सांस्कृतिक भवन, देसाईगंज (वडसा) येथे झालेल्या आढावा बैठकीत कोरची तालुक्यातील कोटगुल व परिसरातील आदिवासी बांधवांच्या प्रलंबित व गंभीर प्रकरणांबाबत भाजप युवा मोर्चा

Aug 12, 2026
शेंदुरजना (आढाव) येथील ७ हात पंपांपैकी ५ बंद!

शेंदुरजना (आढाव) येथील ७ हात पंपांपैकी ५ बंद!

Shendurjana hand pump: ७ हात पंपासाठी दिलेल्या ४.८७ लाख रुपयांचा खर्च अपूर झाला. उरलेली रक्कम शासनात जमली आहे. चार हातपंप सध्या काम करीत नाहीत, गावपंचायताने कामाचे तपासणी आदेश दिले.

Aug 12, 2026