प्रधानमंत्री ग्रामसडक योजना

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे डांबरीकरण महिनाभरातच उखडले..

PM Gram Sadak Yojana: अतिसंवेदनशील आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर अतिदुर्गम भागात वसलेल्या कोरची तालुक्यात कोट्यावधी किंमतीचे दोन पुल तसेच पुल वजा बंधारा वाहुन

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे डांबरीकरण महिनाभरातच उखडले..

PM Gram Sadak Yojana

 

संबंधित अभियंत्यांचा निष्काळजीपणा, कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह?

कोरची (PM Gram Sadak Yojana) : अतिसंवेदनशील आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर अतिदुर्गम भागात वसलेल्या कोरची तालुक्यात कोट्यावधी किंमतीचे दोन पुल तसेच पुल वजा बंधारा वाहुन पहिल्याच पावसात वाहून गेल्याच्या घटना चव्हाट्यावर आल्या न आल्या तोच महिनाभरापुर्वीच  प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत बांधकाम करण्यात आलेला तीन किलोमीटर डांबरीकरणही अल्पावधितच उखळल्याची गंभीर तेवढेच धक्कादायक वास्तव चव्हाट्यावर आले आहे.
           
यामुळे संबंधित विभागाच्या अभियंत्यांचा निष्काळजीपणा परत एकदा चव्हाट्यावर आल्याने एकुणच संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केल्या जाऊ लागले आहेत. कोरची तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नाडेकल- खोब्रामेंढा या( PM Gram Sadak Yojana) मार्गाचे कोट्यावधी रुपये खर्च करून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत खडीकरण करून डांबरीकरण करण्यात आले.खडीकरणाचा काम अतिशय निकृष्ट दर्जाचा करण्यात आल्याने यावर करण्यात आलेल्या डांबरीकरणाला महिनाभरातच जागोजागी भेगा पडल्याने डांबरीकरण तडकले.
     
दरम्यान याबाबत संबंधित विभागाच्या अभियंत्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद देत नसल्याने करण्यात आलेल्या डांबरीकरणात प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. नाडेकल-खोब्रामेंडा मार्ग तालुका मुख्यायला जोडणारा प्रमुख मार्ग असुन या (PM Gram Sadak Yojana) महामार्गावरून मोठ्या प्रमाणात रहदारी आहे.मात्र करण्यात आलेल्या निकृष्ट बांधकामुळे डांबरीकरण जागोजागी तडकल्याने परत सदर रस्ता खड्डेमय होण्याची शक्यता बळावली असुन करण्यात आलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचा फटका या मार्गावरून आवागमन करणाऱ्या वाहतुकदारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकुणच कोरची तालुक्याला बांधकामाचे पुरते भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे पाहु जाता सदर डांबरीकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारासह निकृष्ट दर्जाचा डांबरीकरण करण्यात मौलिक भुमिका बजावणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या (PM Gram Sadak Yojana) अभियंत्यांना या बांधकामास जबाबदार धरून यथाशिघ्र कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अन्यथा विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरीकांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

दीपिकाच्या ‘स्पिरिट’ एक्झिटवर नवा वाद; निर्मात्यांकडून गंभीर आरोप

दीपिकाच्या ‘स्पिरिट’ एक्झिटवर नवा वाद; निर्मात्यांकडून गंभीर आरोप

Actress Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोणचा बहुचर्चित ‘स्पिरिट’ चित्रपटातून बाहेर पडण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचे बंधू आणि चित्रपटाचे निर्माते..

Aug 21, 2026
कोटगुलमधील आदिवासींच्या गंभीर प्रश्नांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक

कोटगुलमधील आदिवासींच्या गंभीर प्रश्नांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक

BJP Yuva Morcha: नगरपरिषद सांस्कृतिक भवन, देसाईगंज (वडसा) येथे झालेल्या आढावा बैठकीत कोरची तालुक्यातील कोटगुल व परिसरातील आदिवासी बांधवांच्या प्रलंबित व गंभीर प्रकरणांबाबत भाजप युवा मोर्चा

Aug 12, 2026
शेंदुरजना (आढाव) येथील ७ हात पंपांपैकी ५ बंद!

शेंदुरजना (आढाव) येथील ७ हात पंपांपैकी ५ बंद!

Shendurjana hand pump: ७ हात पंपासाठी दिलेल्या ४.८७ लाख रुपयांचा खर्च अपूर झाला. उरलेली रक्कम शासनात जमली आहे. चार हातपंप सध्या काम करीत नाहीत, गावपंचायताने कामाचे तपासणी आदेश दिले.

Aug 12, 2026
ठेकेदारांचा सरकारला कोल्हापुरी झटका..!

ठेकेदारांचा सरकारला कोल्हापुरी झटका..!

कोल्हापूरातील राज्यव्यापी ठेकेदार अधिवेशनामध्ये ठेकदारांनी मागितले 'मेहनतीचा उचल देणे' आणि 'अधिक लाभ न घेणे', तर आर्थिक संकट व प्रशासनात लाचखोरीचे आरोप उभारण्यात येत आहे. ठेकदारींच्या आर्थिक दबावामुळे ८५०० कोटी रुपये अडकल्याने, ३० टक्के ठेकदारांना दिवाळखोरीचे धोकले आहे.

Jun 19, 2026
कोटींचा खर्च; लाखमोलाच्या जागेवरील ८ गाळे बंदच

कोटींचा खर्च; लाखमोलाच्या जागेवरील ८ गाळे बंदच

Rajmata Women Entrepreneur Hall: गाळे बंदच राहिल्याने कोटींचा खर्च वाया गेला. महिलांना रोजगार आणि व्यवसायाची संधी उपलब्ध नाहीत. जिल्हाध्यक्षने तातडीने वापर सुरू करण्याची मागणी.

May 29, 2026