हिंगोली दुकानफोडी

हिंगोलीतील सलग दुकान फोड्यांमुळे व्यापारी धास्तावले; महासंघाची पोलीस अधीक्षकांशी भेट

Hingoli shoplifting: हिंगोलीत अज्ञात चोरट्यांनी पाच दुकानांची फोडणी केली आणि 33 हजार रुपये लंपास केले. तपास न लागल्याने व्यापारी वर्गात नाराजी उद्भवली आहे.

हिंगोलीतील सलग दुकान फोड्यांमुळे व्यापारी धास्तावले; महासंघाची पोलीस अधीक्षकांशी भेट

Hingoli shoplifting

हिंगोली (Hingoli shoplifting) : शहरात सलग दुकानफोडीच्या घटनांनी व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. 5 एप्रिल 2026 रोजी रात्री 9.45 ते 6 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात तीन चोरट्यांनी शहरातील पाच दुकानांचे शटर वाकवून एकूण 33 हजार रुपयांची रोकड लंपास केली. दहा दिवस उलटूनही तपास न लागल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या चोऱ्यांमध्ये चिंतामणी मेडिकलमधून 4,000 रु., अजय मंदाडे यांच्या किराणा दुकानातून 5,000 रु., राहुल वाढवे यांच्या श्रेय डिस्ट्रीब्यूटर्समधून 7,000 रु., साईलीला मेडिकलमधून 7,000 रु. व श्री तुळजाई मेडिकलमधून 2,000 रु. अशी एकूण 33,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोऱ्या झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या (Hingoli shoplifting) पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने बुधवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, उपाध्यक्ष राजेश बगडिया, शहराध्यक्ष सुमित चौधरी यांच्यासह रविंद्र सोनी, माबुद बागबान, शेख मुजीब, शेख जुबेर मामू, राहुल वाढवे, अनिल कोंडेकर, उमेश बोडके व अजय मंदाडे आदी व्यापारी उपस्थित होते. 

शिष्टमंडळाने रात्रीची गस्त वाढवण्याची व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावर डॉ. निलाभ रोहन यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला गती देण्यात येईल, तसेच शहरात रात्रीच्या गस्तीत वाढ केली जाईल, असे आश्वासन दिले. अद्याप आरोपींचा सुगावा न लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असून पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026