हिंगोली घाण साम्राज्य

हिंगोली शहर घाणीच्या विळख्यात; जागोजागी कचऱ्याचे ढीग, नगर परिषद प्रशासन सुस्त

Hingoli Filth Area: हिंगोली शहरात कचऱ्याच्या ढीगामुळे स्वच्छता व संक्रामिक आजारांमधील जोरदार संबंध पाहून गाभीर धोका नागरिकांना मिळाला. जिल्हाधिकारींचा उपस्थिती मागणी

हिंगोली शहर घाणीच्या विळख्यात; जागोजागी कचऱ्याचे ढीग, नगर परिषद प्रशासन सुस्त

Hingoli Filth Area

हिंगोली (Hingoli Filth Area) : शहर सध्या स्वच्छतेच्या गंभीर समस्येला तोंड देत आहे. शहरातील गल्लीबोळापासून मुख्य रस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून नगरपालिका स्वच्छता विभागाची यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली आहे. पावसाळा नुकताच सुरू होत असताना या साचलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे आणि नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

शहरातील अनेक प्रभागांमध्ये आठवडोन्‌आठवडे कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः बाजारपेठ, बसस्थानक परिसर, शाळा-महाविद्यालयांजवळील भाग आणि दाट वस्त्यांमध्ये परिस्थिती अधिकच भयावह आहे. काही ठिकाणी तर कचऱ्याचे ढीग इतके मोठे झाले आहेत की त्याठिकाणी डुकरांसह मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. ही जनावरे कचरा पसरवत असून अपघातांनाही निमंत्रण देत आहेत. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांसाठी हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मध्यंतरी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतः शहरातील विविध भागांची पाहणी केली होती. त्यावेळी (Hingoli Filth Area) हिंगोली शहरातील घाणीचे साम्राज्य पाहून त्यांनी नगरपालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. त्यांच्या आदेशानंतर तात्पुरती मलमपट्टी म्हणून जेसीबीच्या माध्यमातून कचरा जमा करून टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकण्यात आला. मात्र, ही कारवाई केवळ प्रसिद्धीसाठीच होती, हे काही दिवसांतच स्पष्ट झाले. कारवाईनंतर काही दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आणि कचऱ्याचे ढीग पुन्हा त्याच ठिकाणी जमा होऊ लागले.

सध्या म्हणावा तसा जोरदार पाऊस सुरू झालेला नाही, परंतु हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांवर साचलेल्या या कचऱ्यामुळे नाले-गटारे तुंबण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, सखल भागात पाणी साचून साथीचे आजार पसरण्याचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, टायफॉईड, कावीळ यांसारखे जलजन्य आणि कीटकजन्य आजार फैलावण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाच्या पाण्यासोबत हा कचरा वाहून गेल्यास पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित होऊ शकतात.

हिंगोली नगरपालिकेकडे मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची कमतरता असल्याचे कारण नेहमीच पुढे केले जाते. मात्र, नागरिकांचा प्रश्न आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालूनही जर परिस्थिती बदलत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींना कोण विचारणार? स्वच्छता कर्मचाऱ्यांची अनियमितता, कचरा उचलणाऱ्या गाड्यांचे नियोजन नसणे आणि डम्पिंग ग्राउंडच्या व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.

शहरातील सुज्ञ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार निवेदने देऊन, तक्रारी करूनही प्रशासन ढिम्मच असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे हिंगोलीकरांचे आरोग्य वाऱ्यावर सोडले गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुन्हा एकदा यात जातीने लक्ष घालून नगरपालिका प्रशासनाला कडक शब्दांत सूचना द्याव्यात आणि स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबवावी, अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, येत्या काळात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न स्फोटक रूप धारण करू शकतो, असा इशारा नागरिक देत आहेत.

संबंधित सामग्री

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

Latur Zilla Parishad: 'स्वच्छ भारत मिशन' जिल्हाभरात राबविणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेत सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. लिफ्ट महिनोंमहिने बंद आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य

Sep 01, 2026
घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

Chikhali Mayor Andolan: स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी रविवारी (२३ ऑगस्ट) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

Aug 23, 2026
रील स्टार नगराध्यक्षांना कचऱ्याचे ढीग दिसेनात का?

रील स्टार नगराध्यक्षांना कचऱ्याचे ढीग दिसेनात का?

Ausa Garbage Crisis: घंटागाडीतून औषध फवारणीचे रील्स टाकणाऱ्या औसा शहराच्या नगराध्यक्षांना शहरात जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग दिसत नाहीत का? आता संतप्त सवाल औसेकर करीत आहेत.

Aug 19, 2026
अखेर पालिका प्रशासन नरमले, शिवसेनेच्या मागण्या मान्य!

अखेर पालिका प्रशासन नरमले, शिवसेनेच्या मागण्या मान्य!

Latur Municipal Shiv Sena: लातूर महापालिका ने शिवसेनाच्या मागण्यांना मान्य करण्याच्या प्रक्रिया सुरू केली. महापालिकेच्या आयुक्तांनी विकास शुल्कचा चक्का, शहरातील सर्विस रोडवर अतिक्रमण

Aug 13, 2026
मूलभूत सुविधा पुरविण्या चे मागणीसाठी ढोल बजाओ आंदोलन

मूलभूत सुविधा पुरविण्या चे मागणीसाठी ढोल बजाओ आंदोलन

Dhol Bajao Andolan : शहरातील वाढती अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा, बंद पथदिवे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि बंद पडलेल्या उद्यानांच्या प्रश्नांकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त कळमनुरी शहर..

Aug 13, 2026