ढोल बजाओ आंदोलन

मूलभूत सुविधा पुरविण्या चे मागणीसाठी ढोल बजाओ आंदोलन

Dhol Bajao Andolan : शहरातील वाढती अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा, बंद पथदिवे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि बंद पडलेल्या उद्यानांच्या प्रश्नांकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त कळमनुरी शहर..

मूलभूत सुविधा पुरविण्या चे मागणीसाठी ढोल बजाओ आंदोलन

Dhol Bajao Andolan

 

लेखीआश्वासनानंतर आंदोलन मागे

कळमनुरी (Dhol Bajao Andolan ) : शहरातील वाढती अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा, बंद पथदिवे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि बंद पडलेल्या उद्यानांच्या प्रश्नांकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त कळमनुरी शहरातील नागरिकांच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी नगर परिषद कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ आंदोलन’ करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन सुमारे दोन तास चालले. यावेळी नागरिकांनी ढोल वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधून विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

शहरातील अनेक भागांत अस्वच्छता पसरली असून नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात तातडीने विशेष स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच शहरात दोन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करावा, मुख्य मार्गांसह शहरातील बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत आणि दररोज घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन करावे, अशीही मागणी करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शहरातील काही दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. संबंधित व्यापाऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान आणि तिरुपतीनगर येथील उद्यानांची दुरवस्था झाली असून ती तातडीने सुरू करून नियमित देखभाल करावी, शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती ते पेट्रोल पंपापर्यंत नवीन विद्युत पोल उभारून पथदिवे सुरू करावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर नागरिकांच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी रविराज दरक यांना निवेदन देण्यात आले.

 नगरपरिषद चे मुख्य अधिकारी यांनी विविध प्रश्नांवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. शहरातील मुख्य मार्गावरील पथदिवे तातडीने सुरू करण्याबाबत संबंधित गुत्तेदाराला १० ऑगस्ट रोजीच नोटीस देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच स्वच्छता विभागात अपुरा मनुष्यबळ असल्याने अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी नवीन दरपत्रक मागविण्यात आले आहे. दरपत्रकाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरातील स्वच्छतेची कामे करण्यात येतील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचेही लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर नागरिकांनी ‘ढोल बजाओ आंदोलन’ मागे घेतले.

या आंदोलनास माजी आमदार गजानन घुगे, शेख आमेर, वंचित बहुजन आघाडीचे राजू कांबळे, ॲड. इलियास नाईक, विनोद बांगर, ॲड. रवी शिंदे, ॲड. मनोज देशमुख, मोहम्मद परवेज, शेख अय्युब, एहसान सिद्दीकी, सादेक पठाण, अयाज नाईक, सोनू वाढवे, शेख असलम, शिलाबाई खिल्लारे, शेख जाबेर, अमजद कुरैशी, गौस बागवान, नचिकेत वाढवे, शेख अनिस, अरशद पठाण, प्रकाश जोगदंड, साजीद राज आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

Latur Zilla Parishad: 'स्वच्छ भारत मिशन' जिल्हाभरात राबविणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेत सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. लिफ्ट महिनोंमहिने बंद आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य

Sep 01, 2026
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३६१वरील भाटेगाव कालव्यावरील वळणावर पुन्हा अपघात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३६१वरील भाटेगाव कालव्यावरील वळणावर पुन्हा अपघात

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील अपघाताची मालिका सुरूच असताना जिल्हा प्रशासकीय यंत्रणा अद्यापही कुंभकर्णी झोपेमध्येच दिसून येत आहे.

Aug 31, 2026
घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

Chikhali Mayor Andolan: स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी रविवारी (२३ ऑगस्ट) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

Aug 23, 2026
रील स्टार नगराध्यक्षांना कचऱ्याचे ढीग दिसेनात का?

रील स्टार नगराध्यक्षांना कचऱ्याचे ढीग दिसेनात का?

Ausa Garbage Crisis: घंटागाडीतून औषध फवारणीचे रील्स टाकणाऱ्या औसा शहराच्या नगराध्यक्षांना शहरात जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग दिसत नाहीत का? आता संतप्त सवाल औसेकर करीत आहेत.

Aug 19, 2026
लातूर महापालिकेतील काम बंद आंदोलन स्थगित!

लातूर महापालिकेतील काम बंद आंदोलन स्थगित!

Latur Municipal Protest: लातूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्या कक्षामध्ये पालिका नगररचना विभागाचे प्रमुख अक्षय तळदकर यांना झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ

Aug 19, 2026