लातूर जिल्हा परिषद

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

Latur Zilla Parishad: 'स्वच्छ भारत मिशन' जिल्हाभरात राबविणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेत सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. लिफ्ट महिनोंमहिने बंद आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

Latur Zilla Parishad

 

विरोधी पक्ष नेत्यांनीच हाती घेतला झाडू; दर्शनी भागाची केली स्वच्छता!

लातूर (Latur Zilla Parishad) : 'स्वच्छ भारत मिशन' जिल्हाभरात राबविणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेत सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. लिफ्ट महिनोंमहिने बंद आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य असून जाळ्या-जळमटे लागली आहेत. आणि विशेष म्हणजे याकडे सत्ताधारी आणि प्रशासनाचे लक्षच नाही. जिल्हा परिषदेच्या अशा ढिसाळ कारभारावर काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांनी अक्षरश: झाडू फिरवला. जिल्हा परिषदेच्या दर्शनी भागात बंद स्थितीत असलेल्या वाटर फिल्टर व परिसरातील जळमटे जाळ्या झाडूने साफ केल्या. जिल्हा परिषद प्रशासनाचे व सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी विषय यांनी ही मोहीम सुरू केली.

लातूर तालुक्यातील एकुरगा गटाचे जिल्हा परिषद (Latur Zilla Parishad) सदस्य दत्ताभाऊ टेकाळे मंगळवारी जिल्हा परिषदेत आले. जिल्हा परिषदेचे लिफ्ट बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जिल्हा परिषदेच्या दर्शनी भागात पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर ठेवण्यात आले असून ते बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतकेच नव्हे तर या परिसरात जाळ्या जळमटे आणि अस्वच्छता पसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर ते बोलत असतानाच जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या सौ. आशाताई भिसे तेथे आल्या. असे बोलून काय उपयोग आहे, 'आपणच हाती झाडू घेऊन स्वच्छ करूया, असे म्हणत त्यांनी हाती झाडू घेतला आणि स्वच्छता सुरू केली. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये खळबळ उडाली. 

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेत्या सौ. आशाताई भिसे यांनी (Latur Zilla Parishad) जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांसह प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. सात महिने होऊनही जिल्हा परिषदेत अद्यापही विकास कामांना सुरुवात झाली नाही. प्रशासकीय काळात झालेल्या कामांचा आढावा घेतला नाही. लिफ्ट आणि वॉटर फिल्टर च्या दुरुस्तीसाठी तरतूद करूनही दुरुस्ती झाली नाही. एकंदर जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर सत्ताधार्‍यांचा अंकुश राहिला नाही, अशी टीका त्यांनी केली. 

दरम्यान यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य टेकाळे यांनी (Latur Zilla Parishad) जिल्हा परिषदेत सभापती आणि उपसभापती यांनी आपल्या दालनाच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र सर्वसामान्य जनतेसाठी मात्र पाणी, स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, लिफ्ट यासारख्या मूलभूत सुविधाही नाहीत, असा आरोप केला. जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी तातडीने सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जि.प. सदस्य दत्ताभाऊ टेकाळे यांनी यावेळी दिला आहे.

संबंधित सामग्री

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा; लातूर जि. प. सभेत ठराव! 

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा; लातूर जि. प. सभेत ठराव! 

Latur Zilla Parishad: लातूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतकरी संकटात असून शासनाने लातूर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी

Sep 22, 2026
'आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं...' लातूरच्या महानगरपालिकेत आयुक्तांचे आदेश प्रभावहीन!

'आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं...' लातूरच्या महानगरपालिकेत आयुक्तांचे आदेश प्रभावहीन!

Latur Municipal Corporation: लातूर महानगरपालिकेत आयुक्तांनी काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी तात्काळ किंवा विहित वेळेत होतच नाही, उलट आयुक्तांचे आदेश धूळ खात पडलेले असतात. हे आदेश धूळ खात पडण्यासाठी

Aug 11, 2026
वर्षभरापासून 15 आरोग्य उपकेंद्रे वाऱ्यावर!

वर्षभरापासून 15 आरोग्य उपकेंद्रे वाऱ्यावर!

Latur Health Sub-centre: लातूर जिल्ह्यातील जवळपास 15 आरोग्य उपकेंद्रांमधील डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागात रुग्णवाहतुकीची काळजी पडली आहे. सरकार आणि जिल्हा परिषद

Jul 06, 2026
कारभाऱ्यांच्या भत्ता वाढीचा आजच्या जि. प. सभेत विषय

कारभाऱ्यांच्या भत्ता वाढीचा आजच्या जि. प. सभेत विषय

लातूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांच्या भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वाचा विषय आज होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी येणार आहे.

Jul 06, 2026
37 कोटी 78 लाख 61 हजार रुपये खर्चाचे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक!

37 कोटी 78 लाख 61 हजार रुपये खर्चाचे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक!

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड 16 मार्च रोजी झाली असली तरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांच्याकडे 12 मार्च 2026 रोजी सर्वसाधारण सभा

Mar 19, 2026