छत्रपती संभाजी महाराज

हिंगोलीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छावा दलाची नियोजन बैठक संपन्न

Chhatrapati Sambhaji Maharaj: हिंगोलीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६९व्या जयंतीनिमित्त छावा दलाने भव्य सोहळ्याचे आयोजन केले.

हिंगोलीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छावा दलाची नियोजन बैठक संपन्न

Chhatrapati Sambhaji Maharaj

हिंगोली (Chhatrapati Sambhaji Maharaj) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त छावा दलाच्या वतीने भव्य जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर  सोमवार  २१ एप्रिल २०२६ रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात छावा दलाचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन व आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीत संभाजी महाराजांच्या जयंती (Chhatrapati Sambhaji Maharaj) सोहळ्यास अधिक आकर्षक व भव्य-दिव्य स्वरूप देण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये ढोल-ताशा पथक, नगाडे, पारंपरिक दिखावे, उंट-घोड्यांचे पथक यांसह महाराजांच्या शौर्यगाथा उलगडणाऱ्या कलाकृती सादर करण्याचे नियोजन करण्यात आले. जयंती उत्सवात जास्तीत जास्त शिव-शंभू प्रेमींनी सहभागी व्हावे यासाठी तालुकास्तरावर जनजागृती करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

यावेळी छावा दलाचे संस्थापक उपाध्यक्ष पप्पू भाऊ चव्हाण, जिल्हा अध्यक्ष एड. रमेश शिंदे, दीपक वाघ, अनिलराव शिंदे, बालाजीराव भिसे, अविनाश चव्हाण, राजूभाऊ पाटील, प्रा. अंभोरे, प्रा. कल्याणकर , मोरे , गोपाल चव्हाण, गोपाल मस्के, रवी इंगळे, परमेश्वर नाईकवाल यांच्यासह छावा दलाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या समारोपप्रसंगी  विनायकराव भिसे पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. शिस्तबद्ध व भव्य स्वरूपात संभाजी महाराजांची जयंती साजरी करून त्यांच्या विचारांचा जागर करू, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026