घरकुलधारकांसाठी दिलासा; पाच ब्रास वाळू मोफत 

घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची वाळूअभावी रखडलेली बांधकामे आता मार्गी लागणार आहेत.

घरकुलधारकांसाठी दिलासा; पाच ब्रास वाळू मोफत 

Hingoli Administration

उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांची माहिती

हिंगोली (Hingoli Administration): घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची वाळूअभावी रखडलेली बांधकामे आता मार्गी लागणार आहेत. हिंगोली व सेनगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी 24 एप्रिल ला दिली. 

जिल्ह्यात वाळू मिळत नसल्याने अनेक घरकुले अर्धवट अवस्थेत होती. पावसाळा तोंडावर आल्याने बांधकामे पूर्ण करण्याची चिंता लाभार्थ्यांना सतावत होती. लाभार्थ्यांच्या मागणीनंतर उपविभागीय अधिकारी घुटुकडे व तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या समितीने मोफत वाळू वाटपाचा निर्णय घेतला.
 
हिंगोली तालुक्यात कयाधू नदीवरील आमला घाटावरून २९४ ब्रास, इडोळी ९९ ब्रास, हिंगणी ६१ ब्रास, खरबी ७० ब्रास तर खंबाळा घाटावरून १०९ ब्रास वाळू वाटप होणार आहे. २७ ते २९ एप्रिल या तीन दिवसांत ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून परमीट घेऊन लाभार्थ्यांना वाळू नेता येणार आहे. सेनगाव तालुक्यातील लाभार्थ्यांनीही परमीट घेऊन स्वतःच्या वाहनाने वाळू वाहतूक करावी, असे आवाहन समाधान घुटुकडे यांनी केले.

दरम्यान, हिंगोली व सेनगाव तालुक्यातील १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणेदेखील नियमित केली जाणार आहेत. यात हिंगोली शहरातील रिसाला बाजार व सेनगाव येथील इंदिरानगर भागाचा समावेश आहे. शहरातील लाभार्थ्यांनी नगरपालिकेकडे तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे सादर करावीत. पथकांमार्फत सर्वेक्षण झाल्यानंतर समितीच्या बैठकीत पात्र प्रकरणे नियमित केली जातील, असेही समाधान घुटुकडे यांनी स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026