हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र; हिंदू जागृती आवश्यक – मिलिंद परांडे

हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र; हिंदू जागृती आवश्यक – मिलिंद परांडे

Hindu Unity

वसमत (Hindu Unity) : हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र हिंदूविरोधी शक्तींकडून सातत्याने रचले जात असल्याचा आरोप करत, या पार्श्वभूमीवर हिंदूंनी सावध राहून जागृती करण्याची गरज असल्याचे मत मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले. ते वसमत येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करत होते.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नगरसेवक सिताराम मॅनेवार यांच्या निवासस्थानी शहरातील समाजसेवक, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी मिलिंद परांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी त्यांच्यासोबत क्षत्रिय सहमंत्री अनंत पांडे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश काळे, विभाग मंत्री संदीप गोरे आणि प्रांत संघटन मंत्री गणेश मोकाशे उपस्थित होते.

गंभीर विषयांवर मार्गदर्शन

मिलिंद परांडे यांनी गोवंश संरक्षण, महिला सुरक्षा, लव्ह जिहाद आणि हिंदू लोकसंख्या यांसारख्या विविध गंभीर विषयांवर मार्गदर्शन केले. हिंदूंचा जन्मदर घटत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करत, प्रत्येक कुटुंबात किमान दोन ते तीन अपत्य असावीत, असे मत त्यांनी मांडले.

गोवंश संरक्षण ही काळाची गरज असून यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच लव्ह जिहादच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना फसवण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप करत, हा राष्ट्रीय चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले.

जनगणनेच्या पार्श्वभूमीवर षडयंत्राचा आरोप

जनगणनेच्या पार्श्वभूमीवर हिंदूंमध्ये मनभेद निर्माण करून धर्माच्या रकान्यात ‘हिंदू’ ऐवजी इतर नोंद करण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विविध जाती-समूहांमध्ये गैरसमज पसरवून हिंदूंची संख्या कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

“आपला धर्म जो असेल तोच जनगणनेत नोंदवणे आवश्यक आहे. या कुटिल कारस्थानापासून सावध राहून जागृती करणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

इतर राज्यांतील उदाहरणे

इतर राज्यांमध्ये आदिवासी समाजाला हिंदू म्हणून नोंद करू नये, असे सांगितले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्रात वीरशैव-लिंगायत समाजात मनभेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

हे सर्व नियोजनबद्ध षडयंत्र असून प्रबोधनाच्या माध्यमातून ते हाणून पाडण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीसाठी विविध क्षेत्रातील नागरिक, विचारवंत, व्यापारी, डॉक्टर आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

फ्लाय-दुबई पायलट स्मित माछर यांनी PM मोदींशी संवादात विमानातील संकटाचा अनुभव सांगितला. हनुमान चालिसेमुळे धैर्य मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

Oct 02, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.

Sep 29, 2026
LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG Aadhaar Biometric: ऑक्टोबर 2026 पासून अनुदानासह नियंत्रित दरात एलपीजी रिफिल मिळवण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण (BAA) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले: पेट्रोलियम- नैसर्गिक वायू मंत्रालय

Sep 21, 2026
भारतावर 100 टक्के टॅरिफचा धोका; रशियन तेलावरून अमेरिका-भारत आमनेसामने

भारतावर 100 टक्के टॅरिफचा धोका; रशियन तेलावरून अमेरिका-भारत आमनेसामने

India 100 percent Tariff: रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देणारे ‘लिंडसी ओ. ग्रॅहम यांचा रशिया आणि इराण

Sep 17, 2026
ओडिशाच्या जंगलात सापडले पाच ऑरंगुटान; तस्करीचा संशय

ओडिशाच्या जंगलात सापडले पाच ऑरंगुटान; तस्करीचा संशय

Odisha Orangutan Trafficking: ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील जंगल परिसरात पाच तरुण ऑरंगुटान आढळून आल्याने वन विभागासह वन्यजीवप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. भारतात नैसर्गिकरित्या आढळत नसलेल्या

Sep 10, 2026