LPG आधार बायोमेट्रिक

LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG Aadhaar Biometric: ऑक्टोबर 2026 पासून अनुदानासह नियंत्रित दरात एलपीजी रिफिल मिळवण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण (BAA) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले: पेट्रोलियम- नैसर्गिक वायू मंत्रालय

LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG Aadhaar Biometric

प्रमाणीकरण न केल्यास सिलिंडर मिळेल, मात्र अनुदानाचा लाभ मिळणार नाही

नवी दिल्ली/ मुंबई (LPG Aadhaar Biometric) : घरगुती एलपीजी सिलिंडरवर अनुदानाचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून अनुदानासह नियंत्रित दरात एलपीजी रिफिल मिळवण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण (BAA) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत देशातील 27.43 कोटी सक्रिय घरगुती एलपीजी ग्राहकांपैकी सुमारे 89.9 टक्के ग्राहकांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे या ग्राहकांना पुन्हा प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता नाही. मात्र, (LPG Aadhaar Biometric) अद्याप प्रमाणीकरण न केलेल्या ग्राहकांना अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

कुठे करता येणार प्रमाणीकरण?

एलपीजी ग्राहकांना (LPG Aadhaar Biometric) आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सिलिंडरच्या घरपोच वितरणावेळी, गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाइल ॲपद्वारे पूर्ण करता येईल. इंडेन ग्राहकांसाठी ‘इंडियनऑइल वन’, भारतगॅस ग्राहकांसाठी ‘हॅलोबीपीसीएल’, तर एचपी गॅस ग्राहकांसाठी ‘एचपी पे’ या ॲपचा पर्याय उपलब्ध आहे.

सिलिंडर मिळणे बंद होणार नाही

आधार बायोमेट्रिक (LPG Aadhaar Biometric) प्रमाणीकरण न केल्यास ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणे बंद होणार नाही. मात्र, अनुदानाचा लाभ मिळणार नसून सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावा लागेल. सरकारच्या म्हणण्यानुसार, अनुदानाचा लाभ केवळ पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचवणे तसेच दुबार आणि अपात्र एलपीजी जोडण्या रोखणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.

संबंधित सामग्री

“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

फ्लाय-दुबई पायलट स्मित माछर यांनी PM मोदींशी संवादात विमानातील संकटाचा अनुभव सांगितला. हनुमान चालिसेमुळे धैर्य मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

Oct 02, 2026
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल सिलेंडर 62.50 रुपयांनी महाग

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल सिलेंडर 62.50 रुपयांनी महाग

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल LPG सिलेंडर 62.50 रुपयांनी महागला. दिल्लीतील 19 किलोचा सिलेंडर 2810 रुपयांवर पोहोचला, तर घरगुती सिलेंडरचे दर स्थिर आहेत.

Oct 01, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.

Sep 29, 2026
मृत्यूची नोंद वेळेत करा! १ ऑक्टोबरपासून विलंब झाल्यास वाढणार सरकारी प्रक्रिया

मृत्यूची नोंद वेळेत करा! १ ऑक्टोबरपासून विलंब झाल्यास वाढणार सरकारी प्रक्रिया

१ ऑक्टोबरपासून मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल होणार असून, विलंब झाल्यास दंडाधिकाऱ्यांच्या आदेशासह अतिरिक्त कागदपत्रे आणि पडताळणी आवश्यक राहणार आहे.

Sep 29, 2026
भारतावर 100 टक्के टॅरिफचा धोका; रशियन तेलावरून अमेरिका-भारत आमनेसामने

भारतावर 100 टक्के टॅरिफचा धोका; रशियन तेलावरून अमेरिका-भारत आमनेसामने

India 100 percent Tariff: रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देणारे ‘लिंडसी ओ. ग्रॅहम यांचा रशिया आणि इराण

Sep 17, 2026