नागपुरात खेळता-खेळता घडली दुर्दैवी घटना; ११ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू

प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेवाळकर अपार्टमेंटमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपुरात खेळता-खेळता घडली दुर्दैवी घटना; ११ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू

Hanging Incident

प्रतापनगर परिसरातील शेवाळकर अपार्टमेंटमधील घटना; कुत्र्याच्या पट्ट्यामुळे अपघाती मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

नागपूर (Hanging Incident) : प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेवाळकर अपार्टमेंटमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मल्हार अनमोल रंगारी (वय ११) असे मृत मुलाचे नाव असून, घरात खेळत असताना घडलेल्या अपघातामुळे त्याचा जीव गेल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी नोंदवला आहे.

मल्हार हा सहाव्या इयत्तेत शिक्षण घेत होता. त्याचे वडील खासगी कंपनीत कार्यरत आहेत, तर आई बँकेत नोकरी करते. घटना घडली त्यावेळी दोघेही आपल्या कामावर गेले होते. घरात मल्हार, त्याची मोठी बहीण आणि आजी उपस्थित होती.

माहितीनुसार, दुपारच्या सुमारास मल्हार आणि त्याची बहीण घरामध्ये खेळत होते. काही वेळाने मल्हार एका खोलीत गेला आणि त्याने खोलीचे दार आतून बंद केले. बराच वेळ उलटूनही तो बाहेर न आल्याने बहिणीला संशय आला. तिने अनेकदा हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने आजीला याची माहिती दिली.

यानंतर दुसऱ्या चावीच्या मदतीने खोली उघडण्यात आली. दार उघडताच मल्हार बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्या गळ्याभोवती कुत्र्याचा पट्टा अडकलेला असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती तत्काळ आई-वडिलांना देण्यात आली. शेजाऱ्यांच्या सहकार्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रतापनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक चौकशीत, कुतूहलापोटी मल्हारने खिडकीला बांधलेला कुत्र्याचा पट्टा गळ्यात घातला असावा, अशी शक्यता तपासली जात आहे. त्यावेळी तो चाक असलेल्या खुर्चीवर उभा होता. अचानक संतुलन बिघडल्याने खुर्ची सरकल्याचा आणि त्यामुळे पट्टा गळ्याभोवती आवळला गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रंगारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांनीही शोक व्यक्त केला आहे.

संबंधित सामग्री

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

ST Bus Accidental Death: कांद्री परिसरातील नागपुर-जबलपुर महा मार्गावर पेट्रोल पंपासमोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना

Sep 20, 2026
यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

घाटंजीतील चिखलवर्धा येथे कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय अंशचा उपचारादरम्यान मृत्यू. ऑक्सिजन व रुग्णवाहिका उपलब्धतेबाबत नातेवाइकांचे गंभीर आरोप.

Sep 18, 2026
पावसाचा मोठा खंड पडल्याने आर्थिक विवंचनेतून उजनी येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

पावसाचा मोठा खंड पडल्याने आर्थिक विवंचनेतून उजनी येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

उजनी येथील ४६ वर्षीय शेतकरी श्रीमंत बिभीषण वळके यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा आणि पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने ही घटना घडली.

Sep 13, 2026
नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अंबिका नगर येथे बाळ मित्र शिव सेवा मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्यानिमित्त महाआरती, नंदी बैल पूजा, गोपालकाला आणि बक्षीस वितरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sep 10, 2026