एसटी बस अपघाती मृत्यु

एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

ST Bus Accidental Death: कांद्री परिसरातील नागपुर-जबलपुर महा मार्गावर पेट्रोल पंपासमोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना

एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

ST Bus Accidental Death

कन्हान (ST Bus Accidental Death) : कांद्री परिसरातील नागपुर-जबलपुर महा मार्गावर पेट्रोल पंपासमोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना रविवार (दि.२०) सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
         
प्राप्त माहितीनुसार, मृतक क्रिष्णकुमार रघुवंशी अंदाजे वय ७० वर्षे असे सांगण्यात येत आहे. क्रिष्ण कुमार रघुवंशी यांनी सत्रापुर परिसरातील खंडेलवाल ट्यूब येथे सुमारे २२ वर्षे नोकरी केली होती. ते त्यांच्या दुचाकी क्र. एमएच ३१ डी.जी ३३८० वरून दुपारच्या सुमारास काही कामानिमित्त खदान परिसरात गेले होते. (ST Bus Accidental Death) काम आटोपुन घरी परत येत असताना नागपुर-जबल पुर महामार्गावरील कांद्री परिसरातील पेट्रोल पंपासमो र रामटेकहुन नागपुरकडे जाणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच १४ एन.ई ६०३६ ने दुचाकीला जोरदार धडक मारली. धडकेमुळे क्रिष्णकुमार रघुवंशी हे दुचाकीवरू न खाली पडले. यावेळी बसचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने ते गंभीर जख्मी झाले.

अपघाताची माहिती मिळताच कन्हान पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्ष क कृष्णा गुंगले, वाहतुक प्रभारी अधिकारी अनिल यादव व गुरुप्रकाश मेश्राम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जख्मी क्रिष्णा रघुवंशी यांना उपचारास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासुन त्यांना मृत घोषित केले. (ST Bus Accidental Death) घटनेचा  पुढील तपास कन्हान पोलीस करित असुन बातमी लिहेस्तोर या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.

टैग्स: ST Bus Accidental Death

संबंधित सामग्री

एसटीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; दुसरा गंभीर

एसटीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; दुसरा गंभीर

ST Bus Accidental death: सटी बसने दिलेल्या धडकेत फाळेगाव येथील एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना मालेगाव येथील तामसी फाट्यावरील उड्डाणपुलावर घडली.

Aug 20, 2026