Gutkha Seizure

वसमतमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त; दोघांना अटक, 1.36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जिल्ह्यातील वसमत शहरात अन्न व औषध प्रशासन आणि वसमत शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे.

वसमतमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त; दोघांना अटक, 1.36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Gutkha Seizure

अन्न व औषध प्रशासन आणि वसमत शहर पोलिसांची संयुक्त कारवाई

हिंगोली (Gutkha Seizure) : जिल्ह्यातील वसमत शहरात अन्न व औषध प्रशासन आणि वसमत शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 1 लाख 36 हजार 336 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी तुषार श्रीराम घोपे यांच्या फिर्यादीवरून 29 जून रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपी धोंडीबा केदारलिंग तुपेकर आणि युनूस करीम खान हे दोघेही वसमत येथील रहिवासी आहेत. धोंडीबा तुपेकर हा बाबा कन्फेक्शनरीसमोर, तर युनूस खान हा ए.के. कन्फेक्शनरीसमोर प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व सुपारीची वाहतूक आणि विक्री करताना आढळून आला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी धोंडीबा तुपेकर याच्याकडून विमल पान मसाला, गोवा 1000 गुटखा, वझीर गुटखा, राजसी परंपरा यांसह एक मोटारसायकल असा 52 हजार 14 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर युनूस खान याच्याकडून आर.के. क्लासिक पान मसाला, व्ही वन तंबाखू, विमल पान मसाला, जाफरानी जर्दा, राजू इलायची सुपारी, BAWA 270, नखराली स्वीट सुपारी आणि आर.के. क्लासिक सुगंधित तंबाखू असा 84 हजार 322 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखाजन्य पदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक असल्याची माहिती असूनही दोन्ही आरोपी आर्थिक फायद्यासाठी त्यांची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 123, 223, 274 आणि 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सपोनि परगेवार करत आहेत.

या कारवाईमुळे वसमत शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

संबंधित सामग्री

औंढ्यात अवैध गुटखा साठ्यावर पोलिसांची कारवाई; ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

औंढ्यात अवैध गुटखा साठ्यावर पोलिसांची कारवाई; ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

Aundha illegal Gutkha Action:येथील खतीब कॉलनी भागात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या अवैध गुटखा साठ्यावर औंढा नागनाथ पोलिसांनी  ५ ऑक्टोबर सोमवार रोजी कारवाई करून ४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026