केंद्रा बुद्रुक (Minister Narhari Zirwal) : सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक केंद्रीय जिल्हा परिषद शाळे अंतर्गत येत असलेल्या ताकतोडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुमजली इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते १६ सप्टेंबर बुधवार रोजी पार पडले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा,मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण ,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी ,तहसीलदार व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती यावेळी गावातील विकासाबाबत पालकमंत्र्यांनी अनिल पतंगे यांचे भरभरून कौतुक केले गावातील शाळा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
शाळेविषयी सर्वांनी जागृत रहावे शाळेविषयी कोणतीही तडजोड ऐकून घेतली जाणार नसल्याचे यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले तसेच अनिल पतंगे यांनी शाळेच्या आवारामध्येच किचन व मुलांना डायनिंग रूमची सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्याकडे केली तसेच गावाच्या विकास कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मागितला याबाबत पालक मंत्र्यांनी असाच निधी मागत गेलो तर मी कुठपर्यंत पुरणार असे मुश्किल सांगितले. मात्र निधी मंजूर होईलच याच काही शंका नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले तसेच टीईटी परीक्षा पास झालेले रवी सावके यांचा देखील पालकमंत्र्यांनी सत्कार केला.
पालकमंत्र्यांना निवेदनाचा पाऊस
केंद्रा बुद्रुक सहपरिसरामध्ये पाऊस पडत नसला तरी परिसरातील नागरिकांनी पालकमंत्र्यांना निवेदनाचा पाऊस पडला असे म्हणणे वावगे ठरणार नाही पालकमंत्री नरहरी झिरवळ हे ताकतोडा येथील शाळेच्या उद्घाटन उद्घाटन निमित्त आल्याने कहाकर बुद्रुक येथील माजी सभापती तथा सरपंच संतोष पोपळघट,पी एन पोपळघट, किशोर पोपळघट यांनी शाळा शाळेसाठी निवेदन दिले तर वरखेडा येथील मारुती संस्थांच्या वतीने बळीराम महाराज सावंत,माजी सरपंच सावंत, काळे यांनी सदरील मंदिराला दर्जा देण्यासाठी निवेदन देण्यात आले.
तर केंद्रा बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सुतार ,शिवाजी तुरे, चंद्रशेखर कांबळे, संदीप ठोके,विश्वनाथ बनसोडे यांनी अंगणवाडी व शाळा दुरुस्तीसाठी निवेदन दिले तसेच गोंधनखेडा येथील रमेश खिल्लारे यांनी देखील पालकमंत्र्यांना निवेदन दिले बटवाडी येथील ग्रामस्थांनी देखील पालकमंत्र्यांना दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निवेदन दिले मनास पिंपरी येथे देखील पालकमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले केंद्र खुर्द येथे देखील पालकमंत्र्यांनी धावती भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला एकंदर पाऊस कमी मात्र निवेदनाचा पाऊसच पालकमंत्र्याकडे जास्त पडला असे म्हणणे वाघे ठरणार नाही.