पालकमंत्री नरहरी झिरवाळ

गोजेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली सांत्वनपर भेट

Minister Narhari Zirwal: औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील कमलाबाई सोपान कांदे (वय ६०) यांच्या आत्महत्येनंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबाची

गोजेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली सांत्वनपर भेट

Minister Narhari Zirwal

हिंगोली (Minister Narhari Zirwal) : औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील कमलाबाई सोपान कांदे (वय ६०) यांच्या आत्महत्येनंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Zirwal) यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. कमलाबाई कांदे यांच्या नावे स्वतंत्र शेतजमीन नसून शेती त्यांच्या पती सोपान विठोबा कांदे यांच्या नावे आहे. गोजेगाव येथील गट क्रमांक २२/२ (वर्ग-२) ही जमीन सामाईक खात्यावर असून त्यामध्ये सोपान विठोबा कांदे, दत्ता विठोबा कांदे व उद्धव विठोबा कांदे यांचा समावेश आहे. 

कमलाबाई कांदे यांच्या पश्चात पती सोपान विठोबा कांदे, मुलगा विष्णू सोपान कांदे व सून असा परिवार आहे. पालकमंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Zirwal) यांनी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर दिला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपराव चव्हाण माजी जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

टैग्स: Minister Narhari Zirwal

संबंधित सामग्री

तरुणाने व्यसनापासून दूर राहून शिक्षणाकडे लक्ष द्यावे: पालकमंत्री नरहरी झिरवळ

तरुणाने व्यसनापासून दूर राहून शिक्षणाकडे लक्ष द्यावे: पालकमंत्री नरहरी झिरवळ

Minister Narhari Zirwal: तालुक्यातील  गुंडलवाडी येथे गुरुवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत आदिवासी मेळावा उत्साहात पार पडला.

Sep 17, 2026
शेतकरी, महिला-बालकांसह अन्नसुरक्षेला प्राधान्य: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

शेतकरी, महिला-बालकांसह अन्नसुरक्षेला प्राधान्य: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Minister Narhari Zirwal: देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्ह्याचे धार्मिक व ऐतिहासिक वैभव आहे. या मंदिराच्या विकास आराखड्यास दोन टप्प्यात..

Sep 17, 2026
पालकमंत्र्याच्या हस्ते पाच वनपट्टेधारकांना सात बारा वितरीत 

पालकमंत्र्याच्या हस्ते पाच वनपट्टेधारकांना सात बारा वितरीत 

Minister Narhari Zirwal: वनहक्काच्या दाव्यांना गती देत मंजूर वनपट्टेधारकांना हक्काचे दस्तऐवज मिळवून देण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियानात’विविध सेवा देण्यात येणार आहेत. यासोबत विविध उपक्रम राबविण्यात येते.

Sep 17, 2026
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुसेगाव येथे भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुसेगाव येथे भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले

Minister Narhari Zirwal: श्री १००८ भगवान बाहुबली सर्वज्ञ तीर्थक्षेत्र, पुसेगाव येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी 16 फेब्रुवारीला भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बळीराजा सुखी..

Sep 16, 2026