हिंगोली (Minister Narhari Zirwal) : श्री १००८ भगवान बाहुबली सर्वज्ञ तीर्थक्षेत्र, पुसेगाव येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी 16 फेब्रुवारीला भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बळीराजा सुखी, समृद्ध व संपन्न होवो, अशी प्रार्थना केली.

यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांनी परमपूज्य १०५ आर्यिका विशाखा श्रीमाताजी यांचेही दर्शन घेतले. तीर्थक्षेत्र संस्थानच्या वतीने रवि कान्हेड यांनी पालकमंत्री झिरवाळ यांचा सन्मान केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपराव चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष बि,डी बांगर, हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष अशोक शिरामे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.