पालकमंत्री नरहरी झिरवळ

तरुणाने व्यसनापासून दूर राहून शिक्षणाकडे लक्ष द्यावे: पालकमंत्री नरहरी झिरवळ

Minister Narhari Zirwal: तालुक्यातील  गुंडलवाडी येथे गुरुवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत आदिवासी मेळावा उत्साहात पार पडला.

तरुणाने व्यसनापासून दूर राहून शिक्षणाकडे लक्ष द्यावे: पालकमंत्री नरहरी झिरवळ

Minister Narhari Zirwal

 

गुंडलवाडीत आदिवासी मेळावा उत्साहात

कळमनुरी (Minister Narhari Zirwal) : तालुक्यातील  गुंडलवाडी येथे गुरुवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत आदिवासी मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ करण्यात आला. तसेच शासकीय आश्रमशाळा, जामगव्हाण येथे नमो-७३ योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेचे पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मेळाव्यास माजी आमदार संतोष टारफे, माजी जि.प. अध्यक्ष गणाजी बेले, बी.डी. बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक माणिक लोढा, उपविभागीय दंडाधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जिवककुमार कांबळे, प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बारसे, गुंडलवाडीचे सरपंच विजय डवरे, लेखाधिकारी जी.व्ही. हिबारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

गुंडलवाडी व परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होते. महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असल्याचे सांगत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी कोणताही सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. गुंडलवाडीचे सरपंच विजय डवरे यांनी शासकीय आश्रमशाळांमध्येच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू करण्याची मागणी केली. तसेच एकलव्य शाळेसाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. आमदार संतोष टारफे यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्याची मागणी करत विशेषतः आदिवासीबहुल गावांमधील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली. आदिवासी कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.

मेळाव्याच्या निमित्ताने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरीच्या वतीने चित्ररथ उभारण्यात आला होता. सेवा संकल्प अभियानांतर्गत महसूल प्रशासनाच्या वतीने विविध योजनांची माहिती देणारे स्टॉलही लावण्यात आले होते. यावेळी गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे मेळाव्याला संबोधित करताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. आपल्या आयुष्यातील संघर्षाचा अनुभव सांगताना जीवनात कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता प्रयत्नांच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे, असा संदेश त्यांनी तरुणांना दिला.

टैग्स: Minister Narhari Zirwal

संबंधित सामग्री

शेतकरी, महिला-बालकांसह अन्नसुरक्षेला प्राधान्य: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

शेतकरी, महिला-बालकांसह अन्नसुरक्षेला प्राधान्य: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Minister Narhari Zirwal: देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्ह्याचे धार्मिक व ऐतिहासिक वैभव आहे. या मंदिराच्या विकास आराखड्यास दोन टप्प्यात..

Sep 17, 2026
पालकमंत्र्याच्या हस्ते पाच वनपट्टेधारकांना सात बारा वितरीत 

पालकमंत्र्याच्या हस्ते पाच वनपट्टेधारकांना सात बारा वितरीत 

Minister Narhari Zirwal: वनहक्काच्या दाव्यांना गती देत मंजूर वनपट्टेधारकांना हक्काचे दस्तऐवज मिळवून देण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियानात’विविध सेवा देण्यात येणार आहेत. यासोबत विविध उपक्रम राबविण्यात येते.

Sep 17, 2026
गोजेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली सांत्वनपर भेट

गोजेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली सांत्वनपर भेट

Minister Narhari Zirwal: औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील कमलाबाई सोपान कांदे (वय ६०) यांच्या आत्महत्येनंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबाची

Sep 17, 2026
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुसेगाव येथे भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुसेगाव येथे भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले

Minister Narhari Zirwal: श्री १००८ भगवान बाहुबली सर्वज्ञ तीर्थक्षेत्र, पुसेगाव येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी 16 फेब्रुवारीला भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बळीराजा सुखी..

Sep 16, 2026