नर्सिंग प्रशिक्षण प्रमाणपत्र

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व नर्सिंग प्रमाणपत्रांचे वितरण

Nursing Training Certificate: स्वामी विवेकानंद संस्था आणि घोट यांच्या संयुक्त प्रयत्नांमध्ये, घोट येथे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि स्वच्छता दूत अनिल रंगारी यांचे सत्कार केले गेले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व नर्सिंग प्रमाणपत्रांचे वितरण

Nursing Training Certificate

 

स्वच्छता दूत अनिल रंगारी यांच्या सत्कार

घोट (Nursing Training Certificate) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद संस्था,घोट यांच्या संयुक्त विद्यमाने घोट येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी गावातील स्वच्छता दूत सुनील रंगारी यांचा शाल,श्रीफळ व अंगवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला.त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.

तसेच यावेळी नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना नर्सिंग प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे (Nursing Training Certificate) वितरित करण्यात आली. यामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती अधिकार पत्रकार सेनेच्या जिल्हाध्यक्ष रुम्पा शहा होत्या. प्रमुख अतिथी म्हणून घोटचे तमुंस अध्यक्ष दिनकर लाकडे,पत्रकार हेमंत उपाध्ये, गणेश सरकार, रंजीता कुंडू, बाबुराव कुसराम, बबीता शहा, करिश्मा सरकार आदी उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विशद करत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी नर्सिंग प्रशिक्षण घेतलेल्या मुलींना प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

संबंधित सामग्री

चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीत जयस्तंभ चौक ते खामगाव चौफुली मार्गावर सुरू असलेल्या वृक्षलागवडीची नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पाहणी करून वृक्षसंवर्धनाच्या सूचना दिल्या.

Sep 17, 2026
२७ ऑगस्टला जागतिक तलाव दिन; तलाव आहेत म्हणून पाणी आहे! जाणून घ्या संवर्धनाचे महत्त्व

२७ ऑगस्टला जागतिक तलाव दिन; तलाव आहेत म्हणून पाणी आहे! जाणून घ्या संवर्धनाचे महत्त्व

२७ ऑगस्ट हा दिवस जगभरात ‘जागतिक तलाव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Aug 27, 2026
हिंगोलीत ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ

हिंगोलीत ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ

मृद व जलसंधारण, पाणी बचत, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हिंगोली शहरात ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

Aug 21, 2026
जिल्हास्तरीय व्हीजेएनटी मतदारसंघातून जालिंदर बुधवत अविरोध..

जिल्हास्तरीय व्हीजेएनटी मतदारसंघातून जालिंदर बुधवत अविरोध..

Jalindar Budhwat: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) या जिल्हास्तरीय मतदारसंघातून जालिंदर बुधवत यांची अविरोध निवड झाली.

Aug 13, 2026