Maha Walkathon

हिंगोलीत ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ

मृद व जलसंधारण, पाणी बचत, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हिंगोली शहरात ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

हिंगोलीत ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ

नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन

हिंगोली : मृद व जलसंधारण, पाणी बचत, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हिंगोली शहरात ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या अभियानाला हिंगोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मृद व जलसंधारणाची शपथ घेतली.

मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने मृद व जलसंधारण, जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महावॉकेथॉनच्या माध्यमातून मृद व जलसंधारण करा, पाणी वाचवा, जलस्रोतांचे संरक्षण करा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा, हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मृद व जलसंधारण ही शाश्वत विकासाची महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथून महावॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.

उद्घाटनप्रसंगी आमदार संतोष बांगर यांनी उपस्थितांना ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश दिला. तसेच जलसंधारण अभियानांतर्गत प्रत्येक विभागप्रमुखांनी 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत त्यांच्या शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले.

यावेळी मृदसंधारण, जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा संकल्प करण्यात आला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथही देण्यात आली.

महावॉकेथॉनचा मार्ग जिल्हा परिषद प्रशाला मैदान, नवीन न्यायालय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड नाका, इंदिरा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, निर्मल कॅफे आणि पाण्याची टाकी असा होता. या मार्गावरून वॉक पूर्ण केल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे महावॉकेथॉनचा समारोप करण्यात आला.

या उपक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन, मृदक्षय रोखणे, पावसाच्या पाण्याचे संधारण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला. वॉकेथॉनदरम्यान नागरिक आणि तरुणाईने जलजागृतीपर घोषणा दिल्या.

महावॉकेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. एम. शिंदे, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी विशाल चव्हाण, वसमतचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी विकास याचावाड, जलसंधारण अधिकारी अनंत घोलकर, विठ्ठल काळबांडे, उमेश अनमुलवाड, पंकज बारहाते, चैताली मेंते, श्रद्धा डाकोरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पवन माने तसेच मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026