गांजा जप्ती अकोला

अकोलात पुरी-अजमेर एक्सप्रेसमध्ये गांजाची मोठी जप्ती

अकोला रेल्वे पोलिसांनी पुरी-अजमेर एक्सप्रेसमधून दोन संशयितांना ताब्यात घेत 9 किलो गांजा जप्त केला, NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल.

अकोलात पुरी-अजमेर एक्सप्रेसमध्ये गांजाची मोठी जप्ती

- पुरी-अजमेर एक्सप्रेसमधून दोन संशयित ताब्यात
- NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल


अकोला - अकोला रेल्वे पोलीसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत ६७ हजार ५०० रुपयांच्या गांजासह दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. ही कारवाई NDPS कायद्याअंतर्गत करण्यात आली असून रेल्वे परिसरात अवैध वाहतुकीवर पोलिसांनी पुन्हा एकदा लगाम घातला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार सतीष जवंजाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार ट्रेन क्रमांक २०८४३ पुरी-अजमेर एक्सप्रेस अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आल्यानंतर दोन इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे फारूक खान हफिजउल्ला खान ४३, रा. खदान, अकोला व शेख अजीज शेख महेबूब ४५, रा. सोनटक्के प्लॉट, अकोला अशी सांगितली. त्यांच्या जवळील दोन वेगवेगळ्या प्रवासी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये खाकी रंगाच्या सेलोटेपने बांधलेले बंडल आढळून आले. या बंडलमध्ये एकूण ९ किलो ४१० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची किंमत सुमारे ६७ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा गांजा परराज्यातून आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कायद्याच्या कलम २० (ब) (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे , अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप डोलारे, उपनिरीक्षक प्रशांत मुंडे सतीष चव्हाण, सतीष जंवजाळ, गौतम शिरसाट, कपील गवई, तुषार गोंगे, विजय शेंगावकर, कुणाल साखरे आदींनी केली.

संबंधित सामग्री

मुंबईच्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाचा ३०० रुपयांचा दंड; २०१६च्या शिक्षक मारहाण प्रकरणात वारंवार गैरहजेरी

मुंबईच्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाचा ३०० रुपयांचा दंड; २०१६च्या शिक्षक मारहाण प्रकरणात वारंवार गैरहजेरी

२०१६च्या शिक्षक मारहाण प्रकरणात वारंवार गैरहजेरीमुळे मुंबईच्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाने ३०० रुपयांचा दंड ठोठावला.

Sep 24, 2026
रात्रीच्या अंधारात ड्रोनच्या घिरट्या; रेकी, चोरी की घातपात? बार्शीटाकळी तालुक्यात नागरिकांमध्ये भीती

रात्रीच्या अंधारात ड्रोनच्या घिरट्या; रेकी, चोरी की घातपात? बार्शीटाकळी तालुक्यात नागरिकांमध्ये भीती

बार्शीटाकळी तालुक्यात रात्री विविध गावांमध्ये ड्रोनच्या घिरट्या; चोरीच्या रेकीची चर्चा. पोलिसांनी पाहणी केली असून ड्रोनच्या उद्देशाची चौकशी सुरू आहे.

Sep 20, 2026
नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्यावा, तसेच पातूर तालुक्याच्या सिंचनासाठी विवरा धरणाचा प्रकल्पात समावेश करावा, अशी आमदार नितीनबापू देशमुख यांची मागणी.

Sep 18, 2026
शिक्षक मतदारसंघाच्या रणधुमाळीत अदिती पोहरे उतरणार

शिक्षक मतदारसंघाच्या रणधुमाळीत अदिती पोहरे उतरणार

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अदिती पोहरे उतरणार. उच्चशिक्षित पार्श्वभूमी, अध्यापनाचा अनुभव आणि राजकीय वारसा ठरणार जमेची बाजू.

Sep 13, 2026
संपूर्ण राज्यात पावसाचा मोठा खंड; पातूर तालुक्यात पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर

संपूर्ण राज्यात पावसाचा मोठा खंड; पातूर तालुक्यात पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर

​​​​​​​देशात यावर्षी अल निनोमुळे पावसाच्या प्रमाणात मोठी तूट दिसून येत आहे.

Sep 09, 2026