Gambling Raid

परभणीत जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

शहरातील हडको कॉर्नर परिसरात वॉटर प्लांटमध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या डावावर नवा मोंढा पोलिसांनी छापा टाकून २ लाख ५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

परभणीत जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gambling Raid

हडको कॉर्नर परिसरातील वॉटर प्लांटमध्ये सुरू होता जुगाराचा डाव; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी : शहरातील हडको कॉर्नर परिसरात वॉटर प्लांटमध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या डावावर नवा मोंढा पोलिसांनी छापा टाकून २ लाख ५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता करण्यात आली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सपोनि कासले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि डोंबे यांच्यासह पोलीस अंमलदार मोहसिन, सुरवसे, खुपसे, लोमंटे, सय्यद अक्रम आणि अनिल कटारे यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती घेत परिसरात गस्त घालत होते. याचदरम्यान पथकाला हडको कॉर्नर परिसरातील वॉटर प्लांटमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली. छाप्यात रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी या सर्व मुद्देमालासह एकूण २ लाख ५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, या कारवाईनंतर पोलीस अंमलदार रामराव खुपसे यांच्या फिर्यादीवरून वैभव जामगे, प्रसिक वावळे, शेख मुज्जसीर, रंजीत सूर्यवंशी, मिर्झा जाफर अली बेग, सुनिल जाधव, रोहन पंडीत आणि गौतम निवडंगे यांच्याविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

Latur Matka-Gambling Raid: लातूरचे पोलीस हेल्मेट सक्तीच्या कामगिरीत गुंतले असताना दुसरीकडे नांदेडच्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने लातूर शहर जिल्ह्यात राजरोस चालणाऱ्या मटका व जुगारांवर धाड..

Oct 01, 2026