वसमत पोलिसांचा ऑनलाईन लॉटरी वर छापा ; सहा जणांसह 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त

वसमत येथील बस स्टँड समोरील भागात राजश्री ऑनलाइन लॉटरी नावाचा लॉटरीचा खेळ चिठ्ठ्या देऊन चालवत असलेल्या ठिकाणी वसमत शहर पोलिसांनी छापा मारला.

वसमत पोलिसांचा ऑनलाईन लॉटरी वर छापा ; सहा जणांसह 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त

Gambling Racket

वसमत (Gambling Racket) : वसमत येथील बस स्टँड समोरील भागात राजश्री ऑनलाइन लॉटरी नावाचा लॉटरीचा खेळ चिठ्ठ्या देऊन चालवत असलेल्या ठिकाणी वसमत शहर पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात सहा जणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या छाप्याने वसमत येथील ऑन लाईन लॉटरी नावाचा जुगार चालवण्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का याचा शोध वसमत पोलीस घेत आहेत.

वसमत येथील बस स्थानकासमोरील भागात राजश्री ऑनलाइन लॉटरी नावाचा लॉटरीचा खेळ चिठ्ठ्या देऊन चालवला जात असल्याची माहिती वसमत शहर पोलिसांना लागली पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रविवारी सायंकाळी छापा मारला व सहा जणांसह लॉटरीचे साहित्य व रोख रक्कम असा 59 हजार 388 जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नितीन रामदीनवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून धर्मपुरी नारायण गश्चेवार, संतोष बबन बोड्डेवार,शेख जुब्बेर शेख युनुस ,गंगाधर गणेश बोखारे  रा. एकदरा ता. जि. नांदेड ह.मु. मंगळवारपेठ वसमत ईमरान चौधरी रा. वसमत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई रामदिनवार, शेख नय्यर, लेकुळे, अवचार, अजय पंडित, इमरान कादरी, बाबळे आदी कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शेख नय्यर करत आहेत. अवैध व्यवसाय विरोधात धडक मोहीम सुरू असतानाही बस स्टॅन्ड समोरील भागात ऑनलाइन लॉटरी नावाचा जुगार लॉटरीचा खेळ चिठ्ठ्या देऊन चालवणारे हे आरोपी पोलिसांनी उजेडात आणले. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026
निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

२०२०च्या खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरोप नाकारले.

Sep 29, 2026