शेतातील इलेक्ट्रिक तारांमध्ये शार्टसर्किट होवून साडेतीन एकरातील मका व ठिबक सिंचन संच,पाईप जळून खाक

तालुक्यातील ग्राम देवधाबा येथील शेतातील विद्युततारांमध्ये दि.16 एप्रिल 26 रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान शॉर्टसर्किट झाले.

शेतातील इलेक्ट्रिक तारांमध्ये शार्टसर्किट होवून साडेतीन एकरातील मका व ठिबक सिंचन संच,पाईप जळून खाक

Electricity Short Circuit

दोघा शेतकऱ्यांचे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची शिवसेना (उबाठा) ची म.रा.वि.वि कंपनी कडे मागणी 

मलकापूर (Electricity Short Circuit) : तालुक्यातील ग्राम देवधाबा येथील शेतातील विद्युततारांमध्ये दि.16 एप्रिल 26 रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान शॉर्टसर्किट झाल्याने साडेतीन एकर शेतातील 140 क्विंटल मका, स्प्रिंकलर,ठिबक,पाईप जळाल्याने तब्बल साडेपाच लाख रुपयांचे दोघा शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याने त्यांना म.रा.वि.वि कंपनीने तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहर प्रमुख हरिदास गणबास यांनी एका निवेदनाद्वारे म.रा.वि.वि कंपनी अभियंता आर.जी. तायडे यांचे कडे केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, ग्राम देवधाबा येथील गट नंबर 42 मंजुळाबाई देविदास गोरले यांचे शेतातील दोन एकर मका, ठिबक सिंचन सट, पाईप असा एकूण अडीच लाख रुपयाचे साहित्य जळून नुकसान झाले आहे, तर उमाकांत देविदास गोरले  गट नंबर 51 यांच्या दीड एकर शेतातील मका, स्प्रिंकलर, ठिबक सिंचन, पाईप आदी जळून तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.दोघा शेतकऱ्यांचे अंदाजे साडेपाच लाखापर्यंतचे नुकसान असून शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असल्याने म.रा.वि् वि कंपनीने त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहर प्रमुख हरिदास गणबास,उमाकांत देविदास गोरले, केशव देविदास गोरले, देविदास सुखदेव गोरले, परमेश्वर प्रभाकर बोरसे, दिपक श्रीराम निळे यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे आणि संपूर्ण अहवालानंतर मदत देण्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.

Sep 28, 2026
महाराष्ट्रात 77 हजार कोटींचे शेती नुकसान? रोहित पवारांचा दावा; हेक्टरी 50 हजारांच्या मदतीची मागणी

महाराष्ट्रात 77 हजार कोटींचे शेती नुकसान? रोहित पवारांचा दावा; हेक्टरी 50 हजारांच्या मदतीची मागणी

रोहित पवारांचा महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेती नुकसानीवरून सरकारवर निशाणा. 77 हजार कोटींच्या नुकसानीचा दावा करत हेक्टरी 50 हजारांची मदत मागितली.

Sep 28, 2026
आदित्य ठाकरे कडून मोबाईल टॉर्च च्या उजेडात पीक नुकसानीची पाहणी

आदित्य ठाकरे कडून मोबाईल टॉर्च च्या उजेडात पीक नुकसानीची पाहणी

Aditya Thackeray: वसमत तालुक्यातील माळवटा शिवारात शनिवारी रात्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे वसमत तालुक्यात आले होते माळवटा शिवारात त्यांनी रात्री आठ साडेआठच्या सुमारास पाहणी केली

Sep 27, 2026
दुष्काळाचा केवळ जीआर, प्रत्यक्ष मदत कधी? सुधाकर देशमुखांचा सरकारवर हल्लाबोल

दुष्काळाचा केवळ जीआर, प्रत्यक्ष मदत कधी? सुधाकर देशमुखांचा सरकारवर हल्लाबोल

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार? सुधाकर देशमुखांचा सरकारला सवाल.

Sep 27, 2026
घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे आदित्य ठाकरेंनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Sep 27, 2026