Farmers Crisis

घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे आदित्य ठाकरेंनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

Farmers Crisis

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल; तावशी (ताड) येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

औसा : ‘तुम्ही घाबरून जाऊन आपल्या जिवाचे काही बरे-वाईट करून घेऊ नका. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,’ असा धीर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे शनिवारी (दि. २६) दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधला.

सरकारने केवळ घोषणांचा पाऊस पाडू नये. शेतकऱ्यांना मदत कधी व किती मिळणार, हे जाहीर करावे. तसेच त्याची अंमलबजावणी कधी होणार, हेही स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दुष्काळाबाबत राज्य शासनाने शासन निर्णय (जीआर) काढलेला असून, कोणत्या तालुक्याला किती आणि कोणत्या स्वरूपात मदत देणार, हे मुख्यमंत्र्यांनी आधी माध्यमांसमोर येऊन जाहीर करावे. तरच या जीआरला महत्त्व असेल. अन्यथा त्या जीआरला कसल्याही प्रकारचे महत्त्व राहणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने या भागातील शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसाअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यता मावळली आहे. सतत निसर्गाच्या संकटात सापडणाऱ्या औसा तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली असून, सत्ताधारी केवळ घोषणा करत असल्याची टीका त्यांनी केली.

सध्या या भागातील शेतकऱ्यांसाठी तातडीच्या उपाययोजना सुरू होणे गरजेचे असतानाही सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे. काढलेला जीआर फसवा असू शकतो, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. जीआरमध्ये कोणती व कशी मदत देणार, याचा उल्लेख नसल्याने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ माध्यमांसमोर येऊन याबाबत सविस्तर माहिती द्यावी. तसेच नव्याने सविस्तर जीआर काढून शेतकऱ्यांच्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेचे माजी सभापती अंबादास दानवे, आमदार प्रवीण स्वामी, आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख परमेश्वर सातपुते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, बजरंग जाधव, शिवराज मुळगावकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका जयश्री उटगे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, आकाश माने, सोशल मीडिया प्रमुख विशाल पवार, शहरप्रमुख सुरेश भूरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

‘पळपुटे मुख्यमंत्री’ म्हणावे लागेल; आदित्य ठाकरेंची टीका

या भागात दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी येथील शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन थांबले होते, असे स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री या ठिकाणी क्षणभरही थांबले नाहीत. अशा मुख्यमंत्र्यांना ‘पळपुटे मुख्यमंत्री’ म्हणावे लागेल, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

यावेळी त्यांनी महिला शेतकऱ्यांशीही संवाद साधला. तसेच तावशी (ताड) येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026