Drought

दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा!

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करण्याची मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा!

Drought

माजी आमदार धीरज देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा पाऊस आणि अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात धीरज देशमुख यांनी नमूद केले आहे की, अपुरा व अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट आणि जमिनीत ओलावा न राहिल्याने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या असून, उभ्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या बिकट परिस्थितीत ग्रामीण भागातील जनजीवन वाचवण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर ठोस उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने बाधित जिल्ह्यांमध्ये तातडीने जिल्हा व तालुकास्तरावर पीक नुकसानीचे पंचनामे करून आवश्यक त्या ठिकाणी त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे (DBT) नुकसानभरपाई जमा करावी, शेती कर्जांचे पुनर्गठन करून व्याज माफ करावे आणि संकटकाळात सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली तात्काळ स्थगित करावी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पावसावर अवलंबून असणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्यासह पशुधनाच्या संरक्षणासाठी चारा छावण्या व चारा बँक तातडीने सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. तात्काळ आर्थिक मदत, पीक संरक्षण आणि दीर्घकालीन उपाययोजनांची सांगड घालून सरकारने बळीराजाला तातडीने आधार द्यावा, असा पुनरुच्चार धीरज देशमुख यांनी केला आहे.

संबंधित सामग्री

माणसांसोबत वन्यजीवांनाही दुष्काळाची झळ; पाण्याच्या शोधात वानरांची गावोगावी भटकंती

माणसांसोबत वन्यजीवांनाही दुष्काळाची झळ; पाण्याच्या शोधात वानरांची गावोगावी भटकंती

Wildlife Drought: यंदाच्या पावसाच्या लहरीपणामुळे या परिसरालाही दुष्काळाची तीव्र झळ बसली आहे. त्याचा परिणाम केवळ शेतकरी आणि शेतीवरच नव्हे, तर जंगल परिसरातील वानरांसह विविध वन्यप्राणी व पक्ष्यांवरही..

Oct 06, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026