हिंगोलीत ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रदर्शनाच्या उद्घाटन व आयोजन प्रसंगी राज्य समन्वयक दीपक जोशी, विभागीय व्यवस्थापक अमित सावंत, विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे तसेच नगरसेवक कपिल भैया खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

हिंगोलीत ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Direct Marketplace

महिला उद्योजकांना मिळाले हक्काचे व्यासपीठ; स्थानिक व्यवसायांना चालना

हिंगोली (Direct Marketplace) : महिला उद्योजकांना स्वतःच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ हे प्रदर्शन व विक्री महोत्सव ५ आणि ६ जून रोजी शेतकरी भवन, मंगळवारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. या दोन दिवसीय उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रदर्शनाच्या उद्घाटन व आयोजन प्रसंगी राज्य समन्वयक दीपक जोशी, विभागीय व्यवस्थापक अमित सावंत, विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे तसेच नगरसेवक कपिल भैया खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी विविध स्टॉलना भेट देत महिला उद्योजकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. अशा प्रदर्शनांमुळे स्थानिक उद्योग व व्यवसायांना नवी संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विविध उत्पादनांनी सजलेली बाजारपेठ

प्रदर्शनात महिला उद्योजकांनी साड्या, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला उत्पादने तसेच विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल उभारले होते. दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण उत्पादनांमुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देत खरेदीचा आनंद घेतला.

उद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी

दोन दिवस चाललेल्या या महोत्सवामुळे स्थानिक उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्याची संधी मिळाली. ग्राहक आणि विक्रेते यांच्यात थेट संपर्क निर्माण झाल्याने उद्योजकांना व्यवसायवृद्धीसाठी नवे मार्ग उपलब्ध झाले. प्रदर्शन परिसरात दोन्ही दिवस उत्साहाचे आणि खरेदी-विक्रीचे वातावरण पाहायला मिळाले.

आयोजकांकडून आभार

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्टॉलधारक, महिला उद्योजक, ग्राहक, स्वयंसेवक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले. भविष्यातही अशाच उपक्रमांच्या माध्यमातून महिला उद्योजकता, स्वयंरोजगार आणि स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

"दर्जेदार खरेदीची खात्री – अमृत पेठ तुमच्यासाठी" या घोषवाक्याला नागरिकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे आयोजकांनी समाधान व्यक्त केले.

संबंधित सामग्री

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोलीतील राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीआधारे १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. ६७८ प्रकरणांचा निपटारा झाला.

Sep 13, 2026