Hingoli Lok Adalat

हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोलीतील राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीआधारे १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. ६७८ प्रकरणांचा निपटारा झाला.

हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

Hingoli Lok Adalat

१२ डिसेंबरच्या राष्ट्रीय लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून निकाली काढण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांचे आवाहन

हिंगोली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी आणि तालुका विधी सेवा समिती, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायिक जिल्हा हिंगोली अंतर्गत येणाऱ्या न्यायालयांमध्ये शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण तब्बल १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची तडजोडीआधारे रक्कम निश्चित करून प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांच्या हस्ते झाले. लोकअदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष श्रीकांत एल. आणेकर आणि तालुका विधी सेवा समिती, हिंगोली यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायाधीश-१ श्रीमती एस. एन. माने-गाडेकर, जिल्हा न्यायाधीश-२ डी. जी. ढोबळे, सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर एस. जी. दुबाले, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती डी. व्ही. भंडारी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले.

दिवाणी न्यायाधीश व. स्तर तथा समन्वयक व्ही. एम. मानखैर, तालुका विधी सेवा समिती, हिंगोली पी. जी. महाळंकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर श्रीमती एस. डी. जायभार, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, कळमनुरी हे उपस्थित होते. अँड. एम. जे. पठाडे, अँड. आर. बी. बांगर, अँड. ए. ए. गायकवाड, अँड. ए. पी. खरटमोल यांनी पॅनल विधीज्ञ म्हणून काम केले.

या लोकअदालतीत सर्वांत मोठ्या रकमेचा ६५ लाख रुपयांचा धनादेश लिबर्टी जनरल विमा कंपनीच्या अधिकारी श्रीमती श्रध्दा किनारे यांनी संबंधित पक्षकारांना तडजोडीअंती सुपुर्द केला.

या लोकन्यायालयात प्रलंबित असलेली १९ हजार ७९९ प्रकरणे, तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती व फायनान्स कंपन्यांची वाद दाखलपूर्व ११ हजार ४३५ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी या लोकअदालतीत प्रलंबित ३६५ व वाद दाखलपूर्व ३१३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

यावेळी जिल्हा वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य अँड. पी. के. शिरसाठ, अँड. एन. एस. घुगे, अँड. एस. के. शिरसाठ, अँड. एम. एस. साकळे, कोषाध्यक्ष अँड. विलास घोंगडे पाटील, सचिव अँड. मिलीद कांबळे, विमा कंपनीचे विधीज्ञ अँड. अजय व्यास, अँड. नरवाडे, अँड. एस. जी. वाघमारे, तसेच वकील संघाचे विधीज्ञ अँड. एस. बी. गडदे, अँड. महेश आहेर, अँड. परतवार, अँड. सुरज शिंदे, अँड. बी. डी. टेकाळे, अँड. रवि जाधव, अँड. महारूद्र जाधव, अँड. आडे, अँड. दायमा, अँड. रवि पठाडे, अँड. स्वप्नील इंगळे, अँड. हनुमान वामन, अँड. मुदसर, अँड. अर्धापुरकर, अँड. निलेश पुरी, अँड. पृथ्वीराज आखरे, अँड. के. नरोटे उपस्थित होते.

या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथील न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ यांचा समावेश असलेले एकूण चार पॅनल करण्यात आले होते. तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सदर लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांनी पुढील १२ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून ती निकाली काढावीत, असे आवाहन केले आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026

हिंगोलीत धुमाकूळ घालणाऱ्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

Sep 13, 2026