डायल ११२

डायल ११२ वर खोटी माहिती देणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

Dial 112: डायल ११२ वर खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेला त्रास देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेशा महादेव झाटे

डायल ११२ वर खोटी माहिती देणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

Dial 112

चान्नी (Dial 112) : आपत्कालीन सेवा डायल ११२ वर खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेला त्रास देणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०९ मे २०२६ रोजी एका व्यक्तीने डायल ११२ वर कॉल करून आपल्या भाचीवर गावातील काही मुलांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. या गंभीर माहितीची दखल घेत पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व चौकशी सुरू केली.

घटनास्थळी भेट देऊन संबंधित व्यक्तींची विचारपूस व बयाण नोंदविण्यात आले. मात्र तपासाअंती सदर माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गणेशा महादेव झाटे (वय २५ वर्ष) याच्याविरुद्ध पोलीसांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याप्रकरणी बीएनएस अधिनियमाच्या कलम १७७ अन्वये चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा ठाणेदार यांच्या आदेशानुसार दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारे खोटी माहिती देऊन आपत्कालीन सेवांचा गैरवापर करू नये. अशा कृत्यांमुळे पोलीस यंत्रणेचा वेळ व संसाधने वाया जातात आणि खरी गरज असलेल्या नागरिकांना मदत मिळण्यात विलंब होऊ शकतो.

संबंधित सामग्री

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026