Dheeraj Pardeshi Murder

अहिल्यानगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हत्येने खळबळ; चार मुख्य आरोपी अटकेत

शहरातील मुकुंदनगर परिसरात विद्युत पोलचे काम करत असलेल्या महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अहिल्यानगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हत्येने खळबळ; चार मुख्य आरोपी अटकेत

Dheeraj Pardeshi Murder

मुकुंदनगर दर्गा दायरा परिसरातील हल्ल्यात धीरज परदेशीचा उपचारादरम्यान मृत्यू; हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट

अहिल्यानगर : शहरातील मुकुंदनगर परिसरात विद्युत पोलचे काम करत असलेल्या महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धीरज परदेशी असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

शुक्रवारी सायंकाळी मुकुंदनगर दर्गा दायरा परिसरातील कबरस्तानात विद्युत पोलचे काम सुरू असताना धीरज परदेशी यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. गंभीर जखमी अवस्थेत धीरज यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काल रात्री चार मुख्य आरोपींना अटक केली. युनूस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

धीरज परदेशी यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, धीरज हे हिंदुत्ववादी असल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. मात्र, या आरोपाची स्वतंत्रपणे पुष्टी अद्याप झालेली नाही.

घटनेनंतर अहिल्यानगर शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून, हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, पतीवर ज्या कबरस्तानात हल्ला झाला, त्याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा, अशी भावनिक मागणी धीरज परदेशी यांच्या पत्नीने केली आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर आले. ‘I am a good fool’ या वाक्यामुळे चर्चेला उधाण आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Sep 16, 2026
छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

लग्नासाठी वारंवार फोन करून दबाव आणि धमक्या दिल्याच्या आरोपानंतर गोंदेगावातील १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सोयगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर १० तासांत करण वाघला अटक केली.

Sep 12, 2026
मुंबई पोलिसांचा ₹6.41 कोटींचा पेरोल घोटाळा; मुख्य सूत्रधार अजय राठोड दहिसरमधून अटक

मुंबई पोलिसांचा ₹6.41 कोटींचा पेरोल घोटाळा; मुख्य सूत्रधार अजय राठोड दहिसरमधून अटक

मुंबई पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागातील ₹6.41 कोटींच्या पेरोल घोटाळ्यात मुख्य लिपिक अजय राठोडला गुन्हे शाखेने दहिसरमधून अटक केली. न्यायालयाने त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.

Sep 09, 2026
नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन 38 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Sep 05, 2026