हिंगोलीत भाजपच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन

हिंगोलीत ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६’ अंतर्गत दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे हॉटेल शांती येथे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.

हिंगोलीत भाजपच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन

Deendayal Upadhyay Training

हिंगोली (Deendayal Upadhyay Training) : भारतीय जनता पक्षाच्या 'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६' अंतर्गत हिंगोली जिल्हास्तरीय दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी शहरातील हॉटेल शांती येथे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

'समर्थ कार्यकर्ता, सशक्त संघटना' ही संकल्पना घेऊन आयोजित या कार्यशाळेचा मुख्य उद्देश पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बांधणी आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावी प्रसार करणे या दोन दिवसांत विविध सत्रांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना वैचारिक आणि संघटनात्मक प्रशिक्षण दिले जात आहे.

​​​​​​​

या कार्यशाळेत प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, विधान परिषद सदस्य प्रा.संजय भेंडे आणि प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव सावजी,भाजपा नेते रेणुकादास देशमुख,प्रदेश सचिव प्रविण घुगे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकुळे,आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, जिल्हा संयोजक फुलाजीराव शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, अतिश दांडेगावकर यांच्यासह जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कार्यशाळेच्या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनप्रवास, 'एकात्म मानववाद' आणि 'अंत्योदय' विचार मांडणारे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तसेच भारतीय जनसंघापासून ते आजच्या भाजपपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांसह हिंगोली जिल्ह्यात झालेल्या विकासकामांच्या माहिती फलकांचेही उद्घाटन जिल्हा प्रभारी संजयभाऊ कौडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026
लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलरचा अखिल चित्रेंचा दावा. DHFL कर्जप्रकरण, 38 गुन्हे आणि पासपोर्टवरून चित्रेंनी सवाल उपस्थित केले.

Oct 03, 2026