नाशिक मध्ये सिगारेटच्या वादातून रक्तरंजित शेवट; पंचवटीत तरुणाचा चॉपरने खून

किरकोळ कारणावरून तरुणाचा जीव घेणारी संतापजनक घटना पंचवटीतील पेठ रोड परिसरात घडली आहे.

नाशिक मध्ये सिगारेटच्या वादातून रक्तरंजित शेवट; पंचवटीत तरुणाचा चॉपरने खून

Chopper Attack Death

नाशिक (Chopper Attack Death) : किरकोळ कारणावरून तरुणाचा जीव घेणारी संतापजनक घटना पंचवटीतील पेठ रोड परिसरात घडली आहे. सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणावर चॉपरने हल्ला करण्यात आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल कृष्णा राऊत (२७, रा. नवनाथ नगर, पेठ रोड) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोके व चेहऱ्यावर भीषण वार
शनिवार (१८ एप्रिल) रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास राहुल राऊत हा आपल्या मित्र टिल्लू पवार आणि सुनील गुंजाळ यांच्यासह नवनाथ नगरमधील साईबाबा मंदिराजवळ बसला होता. त्यावेळी रोहिदास वामनराव आहेर (२६, रा. नवनाथ नगर) तेथे आला आणि राहुलकडे सिगारेटची मागणी केली. मात्र, राहुलने नकार दिल्याने संतापलेल्या रोहिदासने आपल्या जवळील चॉपरच्या मागील बाजूने राहुलच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचार सुरू असताना सोमवारी (२० एप्रिल) पहाटे दोनच्या सुमारास त्याने प्राण सोडले. या घटनेनंतर राहुलचे वडील कृष्णा हरी राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला.

सराईत आरोपी फरार
या हल्ल्यामागील रोहिदास आहेर हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर यापूर्वी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा तसेच म्हसरूळ पोलिस ठाण्यात घरफोडी, मारहाण आणि दहशत पसरवण्याचे गुन्हे दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर आले. ‘I am a good fool’ या वाक्यामुळे चर्चेला उधाण आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Sep 16, 2026
छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

लग्नासाठी वारंवार फोन करून दबाव आणि धमक्या दिल्याच्या आरोपानंतर गोंदेगावातील १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सोयगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर १० तासांत करण वाघला अटक केली.

Sep 12, 2026
मुंबई पोलिसांचा ₹6.41 कोटींचा पेरोल घोटाळा; मुख्य सूत्रधार अजय राठोड दहिसरमधून अटक

मुंबई पोलिसांचा ₹6.41 कोटींचा पेरोल घोटाळा; मुख्य सूत्रधार अजय राठोड दहिसरमधून अटक

मुंबई पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागातील ₹6.41 कोटींच्या पेरोल घोटाळ्यात मुख्य लिपिक अजय राठोडला गुन्हे शाखेने दहिसरमधून अटक केली. न्यायालयाने त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.

Sep 09, 2026
नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन 38 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Sep 05, 2026