१४ वर्षांची नववधू, चार महिन्यांत अंत…बालविवाहाचा भयंकर शेवट!

प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा रंगत असताना वास्तव मात्र अजूनही वेगळंच चित्र दाखवत आहे.

१४ वर्षांची नववधू, चार महिन्यांत अंत…बालविवाहाचा भयंकर शेवट!

Child Marriage

सोलापूर (Child Marriage) : प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा रंगत असताना वास्तव मात्र अजूनही वेगळंच चित्र दाखवत आहे. बालविवाहासारखी कुप्रथा अजूनही ग्रामीण भागात जिवंत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. अवघ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा लग्नानंतर काही महिन्यांतच मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बावची-निंबोणी परिसरातील या मुलीचं काही महिन्यांपूर्वी बालविवाह करण्यात आला होता. बालपण जगायचं वय असताना तिच्यावर संसाराची जबाबदारी टाकण्यात आली. मात्र लग्नानंतर फार काळ न जाताच तिच्या आयुष्यात अडचणींची मालिका सुरू झाली. सासरच्या मंडळींकडून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

शिक्षण घेण्याच्या वयात छळ सहन करावा लागल्याने ती अत्यंत त्रस्त झाली होती. अखेर या परिस्थितीला कंटाळून तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मंगळवेढा पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी पती आणि सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एवढ्या कमी वयातील मुलीचा विवाह कसा झाला? स्थानिक पातळीवर याची कुणालाच कल्पना नव्हती का? बालविवाह रोखण्यासाठी कायदे अस्तित्वात असतानाही असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा बालविवाहाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

संबंधित सामग्री

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी आधीच काढून ठेवले होते 15 हजार रुपये!

दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी आधीच काढून ठेवले होते 15 हजार रुपये!

Goa Sisters Suicide Case: दक्षिण गोव्यातील काणकोण परिसरात एकाच घरात दोन वृद्ध बहिणी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. 70 आणि 73 वर्षांच्या या दोन्ही बहिणी अनेक वर्षांपासून एकत्र राहत होत्या.

Sep 23, 2026
मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विजेची तार पकडून संपविली जीवनयात्रा

मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विजेची तार पकडून संपविली जीवनयात्रा

Maratha reservation Suicide Case: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनाचा प्रवाह सुरू असतानाच वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे एका युवकाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना

Sep 21, 2026
पुण्याजवळ धक्कादायक प्रकार; आजारपणामुळे घरात तणाव; ४३ वर्षीय मामाची हत्या केल्यानंतर भाच्याने संपवले जीवन

पुण्याजवळ धक्कादायक प्रकार; आजारपणामुळे घरात तणाव; ४३ वर्षीय मामाची हत्या केल्यानंतर भाच्याने संपवले जीवन

माधवनगरमध्ये आजारी मामाची हत्या केल्यानंतर २० वर्षीय भाच्याने आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये मामाच्या त्रासाचा उल्लेख; खेड पोलिसांचा तपास सुरू.

Sep 20, 2026
छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

लग्नासाठी वारंवार फोन करून दबाव आणि धमक्या दिल्याच्या आरोपानंतर गोंदेगावातील १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सोयगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर १० तासांत करण वाघला अटक केली.

Sep 12, 2026