शेलूदच्या वर्षानुवर्षांच्या वगदी मार्गाचा प्रश्न अखेर मार्गी

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मौजे शेलूद येथील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला वगदी मार्गाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

शेलूदच्या वर्षानुवर्षांच्या वगदी मार्गाचा प्रश्न अखेर मार्गी

Chikhli Development

आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नांना यश; १ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

चिखली (Chikhli Development) : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मौजे शेलूद येथील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला वगदी मार्गाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत तब्बल १ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.

मौजे शेलूद येथे चिखली नगरीचे आराध्यदैवत आई श्री रेणुकादेवीच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या मानाच्या पातळ व वगदी मार्गासाठी गावकऱ्यांनी अनेक वर्षे विविध लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या न्याय्य मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले. आमदार श्वेता महाले पाटील यांनी मतदारसंघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून तो अखेर मार्गी लावला.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत खालील कामांचा समावेश करण्यात आला आहे :

  • शेलूद ते चिखली नगरपालिका हद्द — २ किलोमीटर रस्ता, किंमत ४० लाख रुपये
  • शेलूद-चिखली जुना पाणंद रस्ता ते पाळाची देवी — २ किलोमीटर रस्ता, किंमत ४० लाख रुपये
  • श्री नागानंद स्वामी संस्थान पर्यटन विकास — २० लाख रुपये

अशा एकूण १ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात “सबका साथ, सबका विकास” या तत्त्वावर ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रस्ते, शेतकऱ्यांसाठी पाणंद मार्ग आणि दळणवळण सुविधांचे जाळे देशभर विस्तारत आहे. याच प्रेरणेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी राज्यभर मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना प्रभावीपणे राबवली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सुलभ पोहोच मिळावी, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट व्हावी आणि गावागावांचा सर्वांगीण विकास व्हावा, हा या योजनेमागचा दूरदर्शी विचार आहे. आमदार श्वेता महाले पाटील या याच विकासदृष्टीने प्रेरित होऊन चिखली मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात विकासकामे पोहोचवण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.

यावेळी बोलताना आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विकासाला नवी गती मिळत आहे. शेलूदच्या जनतेने अनेक वर्षे ज्या मार्गासाठी प्रतीक्षा केली, तो प्रश्न सोडवताना मला विशेष समाधान आहे. ही विकासकामे गावातील नागरिकांच्या जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडवतील. शेतकरी, नागरिक आणि गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने ही कामे अत्यंत महत्त्वाची ठरणार असून चिखली मतदारसंघाच्या ग्रामीण विकासाला यामुळे नवी दिशा मिळणार आहे.”

या भूमिपूजन सोहळ्यास सुरेशआप्पा खबुतरे (ज्येष्ठ नेते, भाजप), सरपंच मंगेश इंगळे, गोपाल अप्पा शेटे, पत्रकार गोपाल तुपकर, संतोष नाना इंगळे, सरपंच सुनील चिंचोले, नगरसेवक दीपक वाधवाणी यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उत्साहाने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026
लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलरचा अखिल चित्रेंचा दावा. DHFL कर्जप्रकरण, 38 गुन्हे आणि पासपोर्टवरून चित्रेंनी सवाल उपस्थित केले.

Oct 03, 2026