कळमनुरीत कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणार - पोलीस निरीक्षक जमीर नाईक

शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी दिली.

कळमनुरीत कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणार - पोलीस निरीक्षक जमीर नाईक

CCTV Surveillance Project

कळमनुरी (CCTV Surveillance Project) : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी दिली. शहरातील अनेक भागांत अद्याप सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नसल्याने गुन्ह्यांचा तपास आणि संशयितांवर लक्ष ठेवण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहराची सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी व्यापारी, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन सीसीटीव्ही बसविण्याच्या उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. व्यापारी वर्गाच्या सहभागामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच, शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीत कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध राहतील, यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात येणार असून, अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

शहरातील रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात येणार असून संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचेही पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी स्पष्ट केले.

अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांच्या निर्देशानुसार कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे आणि बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला पाठीशी घातले जाणार नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

यासाठी विशेष मोहिमा राबवून संशयित हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस पथकांकडून नियमित गस्त, छापेमारी तसेच गोपनीय माहितीच्या आधारे कारवाया करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली.

संबंधित सामग्री

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
नाकाबंदी दरम्यान १३१ वाहनांवर कारवाई; १ लाख १२ हजारांचा दंड

नाकाबंदी दरम्यान १३१ वाहनांवर कारवाई; १ लाख १२ हजारांचा दंड

कळमनुरी पोलिसांची नाकाबंदी; १३१ वाहनांवर कारवाई करून १ लाख १२ हजारांचा दंड वसूल. विनाहेल्मेट, ट्रिपल सीट आणि परवान्याविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई.

Sep 21, 2026
गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा; डिवायएसपी मनीष ठाकरे यांचे आवाहन

गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा; डिवायएसपी मनीष ठाकरे यांचे आवाहन

मानोरा येथे शांतता समितीच्या बैठकीत डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर, सोशल मीडिया अफवांपासून सतर्कता आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन.

Sep 13, 2026
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांचा नकार; आझाद मैदानाची परवानगी रद्द

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांचा नकार; आझाद मैदानाची परवानगी रद्द

मनोज जरांगे पाटील यांच्या १९ सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. कायदा-सुव्यवस्था आणि गणेशोत्सवाचे कारण पुढे केले.

Sep 13, 2026
गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; ‘डीजे’ला फाटा द्या!

गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; ‘डीजे’ला फाटा द्या!

कळमनुरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासह ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करण्याचे आवाहन केले.

Sep 13, 2026