खेट्री जि.प. उर्दू शाळा

सात पैकी चार शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी; खेट्री जि.प. उर्दू शाळेतील शिक्षणावर परिणाम

Khetri ZP Urdu School: खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) कामामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम

सात पैकी चार शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी; खेट्री जि.प. उर्दू शाळेतील शिक्षणावर परिणाम

Khetri ZP Urdu School

पातूर (Khetri ZP Urdu School) : पातूर पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) कामामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेत एकूण सात शिक्षक कार्यरत असताना त्यापैकी चार शिक्षकांकडे बीएलओची जबाबदारी असल्याने अध्यापनासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध राहत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

उर्वरित तीन शिक्षकांमध्ये एक मुख्याध्यापक असून ते प्रशासकीय कामकाजात व्यस्त असतात. त्यामुळे प्रत्यक्ष अध्यापनाची जबाबदारी केवळ दोन शिक्षकांवर येत आहे. या दोघांनाच इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व वर्गांना शिकवावे लागत असल्याने नियमित अध्यापन विस्कळीत होत आहे. एखादा शिक्षक रजेवर गेल्यास एकाच शिक्षकावर आठही वर्गांची जबाबदारी येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.

शाळेतील शिक्षकांची कमतरता आणि त्यातच बीएलओची अतिरिक्त जबाबदारी (Khetri ZP Urdu School) यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शिक्षण विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन बीएलओ कामाचा भार कमी करावा किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी पालक व शाळा व्यवस्थापन समितीकडून करण्यात आली आहे.

"शाळेत सात शिक्षक असले तरी चार शिक्षक बीएलओच्या कामात गुंतले आहेत. उर्वरित शिक्षकांमध्ये मुख्याध्यापक प्रशासकीय कामात व्यस्त असल्याने दोन शिक्षकांवर आठ वर्गांचा अध्यापनाचा भार पडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे."
-मोहम्मद वाजीद, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, खेट्री

शाळेचा कारभार पुन्हा चर्चेत

यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून खेट्री जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. शिक्षकांवरील अतिरिक्त जबाबदाऱ्या, अध्यापनातील अडचणी आणि विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

संबंधित सामग्री

उर्दू शाळेतील शिक्षकावर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप; सहाय्यक शिक्षक निलंबित

उर्दू शाळेतील शिक्षकावर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप; सहाय्यक शिक्षक निलंबित

पोहरादेवी उर्दू शाळेतील सहाय्यक शिक्षकावर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप; जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले. प्रकरणाचा अधिक तपास सुरू.

Sep 12, 2026
अघोषित भारनियमनामुळे ग्रामस्थ त्रस्त; विज वितरण केंद्रासमोर झोपा आंदोलन

अघोषित भारनियमनामुळे ग्रामस्थ त्रस्त; विज वितरण केंद्रासमोर झोपा आंदोलन

Mahavitaran Zopa Andolan: कारखेडा गावातील गावस्थाने अघोषित भारी नियमनामुळे दिव्यार्ध्यांना होणाऱ्या नुकसानासाठी वीजवितरण केंद्रासमोर झोपा आंदोलन करीत आहेत.

Jul 19, 2026
परीक्षाकाळात शिक्षकांवर मतदारयाद्यांच्या कामाचे अतिरिक्त भार

परीक्षाकाळात शिक्षकांवर मतदारयाद्यांच्या कामाचे अतिरिक्त भार

Teacher BLO work: एप्रिलमध्ये परीक्षेच्या काळात शिक्षकांना मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाच्या कामांसाठी नियुक्त करण्यात आले आहे

Apr 13, 2026