शिक्षक बीएलओ काम

परीक्षाकाळात शिक्षकांवर मतदारयाद्यांच्या कामाचे अतिरिक्त भार

Teacher BLO work: एप्रिलमध्ये परीक्षेच्या काळात शिक्षकांना मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाच्या कामांसाठी नियुक्त करण्यात आले आहे

परीक्षाकाळात शिक्षकांवर मतदारयाद्यांच्या कामाचे अतिरिक्त भार

Teacher BLO work

शेकडो शिक्षक बीएलओ कामासाठी नियुक्त

अमरावती (Teacher BLO work) : एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा होत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेतील बीएलओ असलेल्या शिक्षकांना ऐन परीक्षेच्या काळात मतदार याद्या पुनर्निरिक्षणचे (एसआयआर) काम लागल्याने परीक्षा काळातच मतदार याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शेकडो (Teacher BLO work) शिक्षक बीएलओ कामासाठी नियुक्त केले आहेत.

सध्या, एप्रिल महिना परीक्षा तसेच वर्षभरातील कामाचा विद्यार्थ्यांचा लेखाजोखा मांडण्याचा महत्त्वाचा काळ असताना मार्च महिन्यात सुमारे दहा दिवस शिक्षकांना शाळेतून बीएलओ कामासाठी पूर्णवेळ कार्यमुक्त करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा, दैनंदिन अध्यापन व दैनंदिन कामे, दाखलपात्र याद्या, निकाल पत्रक आदी कामे कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.एप्रिल महिन्यात प्रत्येक शाळांमध्ये ऐन परीक्षेच्या काळात पटपडताळणी होणार आहे. त्यामुळे मतदारयाद्यांच्या कामासह गैरहजर विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांना दारोदारी फिरावे लागत आहे. शालेय कामाशिवाय इतर शाळाबाह्य कामांच्या अतिरिक्त बोजामुळे शिक्षक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.

बीएलओ व इतर अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. (Teacher BLO work) शिक्षक बीएलओ कामात व्यस्त असल्याने शालेय नियोजन कोलमडले असून विद्यार्थ्यांची उपस्थितीवर त्याचा विपरीत परीणाम झाला आहे.त्यामुळे विद्यार्थाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.त्याला जबाबदार कोण असा प्रश्न पालक विचारत आहे.तसेच येत्या भर उन्हात ४थी व ७वीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे.संध्दा ११एप्रिल पासुन १ते९वर्गाच्या वार्षिक परीक्षा सुरु आहे.त्यात शिक्षकाकडे बिएलओ चे काम त्यामुळे शिक्षक ञस्त झाले आहे.

किचकट कामामुळे वैतागले शिक्षक

मतदार यादीतील नावांची जुळवणी म्हणजेच मॅपिंग २००२ च्या मतदार यादीतील नातेवाइकांच्या नावाशी जुळवणे, मॅपिंग करणे हे अतिशय किचकट, वेळखाऊ काम आहे. अनेक आदिवासी, अशिक्षित मतदारांना माहिती सांगता येत नसल्याने मॅपिंगची टक्केवारीत वाढ होत नसल्याचे चित्र आहे. ऐन (Teacher BLO work) परीक्षाकाळात शाळेचे कामकाज न करता मतदारयाद्यांचे काम करण्यासाठी शिक्षकांना पूर्ण वेळ द्यावा लागत आहे.

संबंधित सामग्री

संच मान्यतेतील त्रुटी दूर करून अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करा

संच मान्यतेतील त्रुटी दूर करून अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करा

Vidarbha Junior College Teachers' Association: सत्र २०२५-२६ च्या संच मान्यतेमध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त करून, त्याआधारे सुरू करण्यात आलेली अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया तातडीने स्थगित करा...

Oct 01, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

Congress candidate Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांची आढावा बैठक

Sep 29, 2026
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर महासंघाची बैठक झाली. UDISE+ मधील तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन मिळाले.

Sep 29, 2026
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

Amravati Teachers Constituency Election: महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली..

Sep 29, 2026
परभणीत शिक्षकाची मागणी करत बीईओंच्या दालनात ठिय्या आंदोलन...!

परभणीत शिक्षकाची मागणी करत बीईओंच्या दालनात ठिय्या आंदोलन...!

Parbhani Teachers' Protest: शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी जिंतूर गटसाधन केंद्रातील गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात आंदोलन

Sep 24, 2026