महावितरण झोपा आंदोलन

अघोषित भारनियमनामुळे ग्रामस्थ त्रस्त; विज वितरण केंद्रासमोर झोपा आंदोलन

Mahavitaran Zopa Andolan: कारखेडा गावातील गावस्थाने अघोषित भारी नियमनामुळे दिव्यार्ध्यांना होणाऱ्या नुकसानासाठी वीजवितरण केंद्रासमोर झोपा आंदोलन करीत आहेत.

अघोषित भारनियमनामुळे ग्रामस्थ त्रस्त; विज वितरण केंद्रासमोर झोपा आंदोलन

Mahavitaran Zopa Andolan

 

कारखेडा ग्रामपंचायतीचे पोलीस ठाण्यास निवेदन

मानोरा (Mahavitaran Zopa Andolan) : तालुक्यातील कारखेडा, वरोली, रामतिर्थ, सेवादासनगर, तळप बु., विठोलीसह परिसरातील गावांमध्ये गेल्या सोमवारपासून दररोज रात्री ७ ते ११ वाजताच्या दरम्यान अघोषित भारनियमन सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नागरिक आजाराने आणि उकाड्याने त्रस्त झाले आहेत.  या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कारखेडा ग्रामपंचायत सदस्य बबन नारायणराव देशमुख* यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दि. १८ जुलै २०२६ रोजी रात्री ७ वाजताच्या पुढे विज वितरण केंद्राच्या प्रांगणात *झोपा आंदोलन केले. 

ग्रामपंचायत कार्यालय, कारखेडा यांच्या वतीने मानोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नियमित वीज पुरवठा ही मूलभूत आवश्यकता आहे. यासंदर्भात यापूर्वी १७ जुलै २०२६ रोजी उपकार्यकारी अभियंता, वि.वि.कंपनी, मर्या. उपविभाग मानोरा यांना भारनियमन बंद न केल्यास कार्यालयासमोर झोपा आंदोलन करण्याचे लेखी कळविण्यात आले होते. मात्र भारनियमन बंद झाले नसल्याने शनिवारी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
महावितरणच्या (Mahavitaran Zopa Andolan) अघोषित भारनियमनामुळे शिक्षणावर परिणाम होत असुन रात्री अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिक विविध आजारांनी ग्रासले आहेत, रात्रीच्या वेळी वीज नसल्याने उकाड्यामुळे झोप लागत नाही. जर शनिवार सायंकाळी देखील भारनियमन घेण्यात आले तर आम्ही विज वितरण केंद्राच्या प्रांगणात झोपा आंदोलन करू. प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.  

संबंधित सामग्री

सात पैकी चार शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी; खेट्री जि.प. उर्दू शाळेतील शिक्षणावर परिणाम

सात पैकी चार शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी; खेट्री जि.प. उर्दू शाळेतील शिक्षणावर परिणाम

Khetri ZP Urdu School: खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) कामामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम

Jul 21, 2026
केंद्रीय मंत्री श्री,अमित शाह यांच्याविरोधात काढलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला कोरची युवा मोर्चाचे चोख प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री श्री,अमित शाह यांच्याविरोधात काढलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला कोरची युवा मोर्चाचे चोख प्रत्युत्तर

Congress Yuva Morcha: कोरची तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) ने काँग्रेसच्या वनवासी शब्दाविरोधात तीव्र प्रतिउत्तर दिला. युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी ने आरोप केले की काँग्रेस राजकीय

Jun 09, 2026
परीक्षाकाळात शिक्षकांवर मतदारयाद्यांच्या कामाचे अतिरिक्त भार

परीक्षाकाळात शिक्षकांवर मतदारयाद्यांच्या कामाचे अतिरिक्त भार

Teacher BLO work: एप्रिलमध्ये परीक्षेच्या काळात शिक्षकांना मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाच्या कामांसाठी नियुक्त करण्यात आले आहे

Apr 13, 2026