हिंगोली जिल्ह्यात युवा सेनेची ऐतिहासिक कामगिरी

होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेकडून गावपातळीपर्यंत शाखा विस्तारावर विशेष भर दिला जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात युवा सेनेची ऐतिहासिक कामगिरी

BLA Appointment

BLA नियुक्तीत राज्यात प्रथम क्रमांक; संघटनात्मक बांधणीत मोठे यश

हिंगोली (BLA Appointment) : शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवा सेना प्रमुख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यात युवा सेनेने संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांनी हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये १०० टक्के बीएलए (Booth Level Agent) नियुक्त्या पूर्ण करून युवा सेनेची भक्कम संघटनात्मक फळी उभी केली आहे.

होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेकडून गावपातळीपर्यंत शाखा विस्तारावर विशेष भर दिला जात आहे. युवकांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करून पक्षाची मुळे गावागावात अधिक दृढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी

बीएलए नियुक्ती मोहिमेत हिंगोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल युवा सेना प्रमुख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

यावेळी आगामी निवडणुकांमध्येही याच उत्साहाने आणि जोमाने काम करून संघटना अधिक बळकट करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच बूथस्तरावरील संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

हिंगोली जिल्ह्याच्या या यशस्वी कामगिरीमुळे युवा सेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी संघटना पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. जिल्हाभरात युवकांचा वाढता सहभाग आणि मजबूत संघटनात्मक जाळे यामुळे आगामी काळात युवा सेनेची ताकद अधिक वाढणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

संबंधित सामग्री

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026