हिंगोलीत भाजपची 16 व 17 मे रोजी कार्यशाळा

 भारतीय जनता पक्षाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान - 2026 अंतर्गत हिंगोली जिल्हास्तरीय दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोलीत भाजपची 16 व 17 मे रोजी कार्यशाळा

BJP Workshop

हिंगोली (BJP Workshop) : भारतीय जनता पक्षाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान - 2026 अंतर्गत हिंगोली जिल्हास्तरीय दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 16 व 17 मे रोजी शहरातील हॉटेल शांती येथे ही कार्यशाळा पार पडणार आहे.

शनिवारी सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा प्रारंभ होणार आहे. समर्थ कार्यकर्ता सशक्त संघटना संकल्पनेवर आधारित या निवासी कार्यशाळेचा मुख्य उद्देश पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बांधणी आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावी प्रसार करणे हा आहे.

वरिष्ठ नेत्यांचे लाभणार मार्गदर्शन :
दोन दिवसीय प्रशिक्षणात विविध सत्रांमध्ये कार्यकर्त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस सुनिल राणे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, विधान परिषद सदस्य प्रा. संजय भेंडे, मराठवाडा संयोजक मनोज पांगरकर, प्रदेश सचिव प्रविण घुगे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव सावजी, प्रदेश प्रवक्ता विनोद वाघ, भाजप नेते किरण पातुरकर यांचा समावेश आहे.

या कार्यशाळेला खासदार रामराव वडकुते, जिल्हा प्रभारी संजय कौडगे, आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, माजी आ. जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, जिल्हा संयोजक फुलाजीराव शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, अतिश दांडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

चित्र व माहिती फलकांचे प्रदर्शन :
कार्यशाळेच्या निमित्ताने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जीवनप्रवास, त्यांचा एकात्म मानववाद आणि अंत्योदय विचार मांडला जाणार आहे. तसेच भारतीय जनसंघापासून ते आजच्या भाजपपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास, केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना आणि हिंगोली जिल्ह्यात झालेल्या विकासकामांची माहिती चित्रांच्या व माहिती फलकांच्या प्रदर्शनातून मांडली जाणार असल्याची माहिती जिल्हा संयोजकांनी दिली.

संबंधित सामग्री

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

CJP Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sep 24, 2026
संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून संभाजीराव पाटील निलंगेकरांची आक्रमक भूमिका चर्चेत. बँकेच्या कारभारावरून अमित देशमुखांवर आरोप आणि भाजपसमोर सवाल.

Sep 23, 2026