बुटीबोरी नगरपरिषद घोटाळा

बुटीबोरी नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापनात घोटाळा  

Butibori Municipal Council Scam: बुटीबोरी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनात आर्थिक गैरव्यवहार, कामगारांच्या हक्कांची विसंगती आणि नियमबाह्य लाभ याबाबत गंभीर आरोप

बुटीबोरी नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापनात घोटाळा  

Butibori Municipal Council Scam

 

चौकशी आदेशानंतरही कारवाईचा अभाव; प्रशासनावर प्रश्नचिन्ह
प्रशासन व कंत्राटदार यांची मिलिभगत

संदीप बलवीर 
नागपूर (Butibori Municipal Council Scam) :
बुटीबोरी नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार,करारातील अटींचे उल्लंघन तसेच कामगारांच्या हक्कांची पायमल्ली झाल्याचा गंभीर आरोप स्वराज्य जनशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष गौरवसिंह व्ही. हजारी यांनी केला आहे. यासंदर्भात हजारी यांनी विविध शासकीय विभागांकडे तक्रारी दाखल करून चौकशीची मागणी केली आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊनही स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने कंत्राटदार व स्थानिक प्रशासन यांच्यात मिलिभगात असल्याचे आरोप करण्यात येत आहे.

या (Butibori Municipal Council Scam) प्रकरणी कामगार आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, सह आयुक्त नगर परिषद प्रशासन नागपूर विभाग तसेच बुटीबोरी नगरपरिषद प्रशासनाकडे पुराव्यांसह तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत.तक्रारींसोबत कामगारांची निवेदने,वेतनातील विसंगती,वाहनांची माहिती, आरटीआयद्वारे प्राप्त कागदपत्रे आणि करारातील अटींचे तपशील जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तक्रारीमध्ये घनकचरा व्यवस्थापनात कार्यरत कामगारांना शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनापेक्षा कमी वेतन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कामगारांच्या भविष्यात निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विम्या संदर्भातील नियमांचे पालन झाले नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

करारानुसार भाडेतत्त्वावर दाखवण्यात आलेल्या वाहनांची संख्या आणि प्रत्यक्षात कार्यरत वाहनांमध्ये तफावत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कागदोपत्री जास्त वाहने दाखवून लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कामगारांची उपस्थिती, वेतन वितरण आणि बिलांमधील आकडेवारीत गंभीर विसंगती असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच संबंधित ठेकेदाराला नियमबाह्य लाभ मिळवून देण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले किंवा संगनमत केले असावे, असा (Butibori Municipal Council Scam) गंभीर आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान,विभागीय आयुक्त तथा  प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन नागपूर विभाग यांनी या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र वरिष्ठ स्तरावरून आदेश मिळूनही बुटीबोरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चिखलखुंदे यांनी कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर स्वराज्य जनशक्ती फाऊंडेशनने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे. संबंधित ठेकेदाराचे देयके तात्काळ स्थगित करणे, कामगारांना थकीत वेतन व किमान वेतनातील फरक अदा करणे, भविष्य निर्वाह निधी व कर्मचारी राज्य विमा संदर्भात सखोल तपासणी करणे तसेच दोषी अधिकारी व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बुटीबोरी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून स्वच्छतेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्यास प्रशासनाने पारदर्शक व कठोर कारवाई करावी,अशी मागणी गौरवसिंह हजारी यांनी केली आहे.

“घनकचरा व्यवस्थापनासारख्या अत्यावश्यक सेवेत कामगारांचे हक्क,जनतेचा पैसा आणि प्रशासनाची जबाबदारी या तिन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही स्थानिक स्तरावर कारवाई होत नसेल तर दोषींना संरक्षण दिले जात असल्याचा संशय अधिक बळावतो. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
– गौरवसिंह वी.हजारी, अध्यक्ष, स्वराज्य जनशक्ती फाउंडेशन 

सदर तक्रारदार यांनी ज्या बाबी नमूद केल्या आहे यामध्ये कोणतेही तथ्य नाही सदर तक्रारदार हजारी यांची गाडी पूर्वी घनकचरा कंत्राटदार चालवत होता परंतु गाडी निकामी झाल्यामुळे ती त्याने बंद केली त्यामुळेच हेतू परस्पर चुकीचे आरोप करण्यात येत आहे.
-राजेंद्र चिखलखुंदे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, बुटीबोरी

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

Oct 04, 2026
FCRA लाचखोरी प्रकरणात गृह मंत्रालयाचे दोन अधिकारी ताब्यात; नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप

FCRA लाचखोरी प्रकरणात गृह मंत्रालयाचे दोन अधिकारी ताब्यात; नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप

FCRA नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याच्या आरोपावरून गृह मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांना दिल्लीत रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

Sep 30, 2026