नर्सी नामदेव यात्रा आरंभ

Saint Namdev Yatra: संत नामदेवांची यात्रा: पन्नास गावांतील दिंड्या होणार दाखल

नर्सी नामदेव में 19 मार्च से तीन दिन की संत नामदेव यात्रा शुरू हो रही है, जिसमें लाखों भाविक सम्मिलित होंगे।

By : देशोन्नति
Saint Namdev Yatra: संत नामदेवांची यात्रा: पन्नास गावांतील दिंड्या होणार दाखल

नर्सी नामदेव येथे गुढीपाडव्या पासून नामाचा गजर

हिंगोली (Saint Namdev Yatra) : संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पापमोचनी एकादशीच्या दिवशी १९ मार्च गुरुवार पासून तीनदिवसीय यात्रेला सुरवात होत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून लाखो भाविक संत नामदेव महाराजांच्या समाधी दर्शनसाठी दाखल होतील. परिसरातील चाळीस ते पन्नास गावातील दिंड्या यात्रेत दाखल होणार आहेत. हरि नामाच्या गजराने हे गाव तीन दिवस भक्तिरसात दंग होईल.

संत नामदेव महाराज (Saint Namdev Yatra) मंदिर संस्थानतर्फे यात्रा काळात विविध कार्यक्रम होतील. गुरुवारी सकाळी सातला शासकीय महापूजा मान्यवरांच्या उपस्थितीत होईल, नंतर पोलीस ठाण्यातर्फे संत नामदेव महाराजांच्या समाधीसमोर आहेर केला जाणार आहे. यावेळी संस्थानचे विश्वस्त व भाविक उपस्थित राहतील.

२० मार्च शुक्रवार रोजी ग्राम प्रदक्षिणा होणार आहे तसेच आलेल्या दिंड्याचे स्वागत केले जाणार आहे रात्री हरिजागर होणार आहे. २१ मार्च शनिवार रोजी सकाळी ८ ते दुपारी दोन वाजेपर्यंत लाहींचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर आलेल्या दिंड्याचे प्रस्थान होणार आहे.

मिठासाठी यात्रा होती प्रसिद्ध
ही (Saint Namdev Yatra) यात्रा मिठाच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. धान्याच्या बदल्यात मीठ हे या यात्रेचे वैशिष्ट्य होते. पापमोचणी एकादशीला सुरू होणारी मिठाची यात्रा पंधरा दिवस चालत होती. यामध्ये राज्यासह अन्य राज्यांतून मीठ विक्रीसाठी आणले जात होते. परिसरातील शेतकरी, गावकरी बैलगाडीने यात्रेला घेऊन धान्याच्या बदल्यात वर्षभर पुरेल एवढे मीठ खरेदी करत होते. त्यातून मोठी उलाढाल होत होती. आता गावोगावी झालेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे बैलगाड्यांनी येणाऱ्यांची संख्या नगण्य झाली. आधुनिकतेत मिठाच्या साठवणुकीची परंपराही लोपली. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून मिठाची उलाढाल होलसेल’वरून किरकोळ’वर आली आहे.

भाविकांसाठी सुविधा
यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होणार आहेत. त्याशिवाय गुरुवारी रात्री परिसरातील पन्नास गावांतील दिंड्या दाखल होणार आहेत. भाविकांसाठी सोपी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कड़क उन्हाळा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे, अशी माहिती संत नामदेव संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026