Digital Bedtime

रात्री Instagram-Facebook होणार बंद! अल्पवयीनांसाठी Metaचे नवे कडक नियम

सोशल मीडियाच्या अतिवापराचा लहान मुले आणि किशोरवयीनांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता मेटाने Instagram आणि Facebook संदर्भात कठोर नियम लागू करण्याची तयारी केली आहे.

रात्री Instagram-Facebook होणार बंद! अल्पवयीनांसाठी Metaचे नवे कडक नियम

Digital Bedtime

दिवसाला दोन तासांची वापर मर्यादा, शाळेच्या वेळेत Push Notifications वरही निर्बंध

मुंबई : सोशल मीडियाच्या अतिवापराचा लहान मुले आणि किशोरवयीनांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता मेटाने Instagram आणि Facebook संदर्भात कठोर नियम लागू करण्याची तयारी केली आहे. अमेरिकेतील अल्पवयीन युजर्ससाठी रात्रीच्या वेळेत दोन्ही ॲप्सचा वापर बंद ठेवण्यासोबतच दररोजच्या वापरावर दोन तासांची मर्यादा निश्चित केली जाणार आहे. सोशल मीडिया व्यसन आणि वाढता स्क्रीन टाईम कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

18 वर्षांखालील युजर्ससाठी मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ‘नाईट शटडाऊन’ लागू असेल. या कालावधीत Instagram आणि Facebook वरील फीड किंवा Reels पाहता येणार नाहीत. अमेरिकेतील 47 राज्यांकडून मेटाविरोधात करण्यात आलेल्या कायदेशीर दाव्यानंतर कंपनीने 17.1 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 1.43 लाख कोटी रुपयांच्या तडजोडीसह या ‘डिजिटल बेडटाइम’ व्यवस्थेला मान्यता दिल्याचे वृत्त आहे.

मेटाविरोधात 47 राज्यांची कायदेशीर लढाई

‘The New York Times’च्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियाचे ॲटर्नी जनरल रॉब बोंटा यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील एकूण 47 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मेटा प्लॅटफॉर्म्सविरोधात न्यायालयीन कारवाई केली होती. कंपनीने नफा वाढविण्याच्या उद्देशाने Instagram आणि Facebook चे अल्गोरिदम अशा पद्धतीने तयार केल्याचा आरोप करण्यात आला होता की, त्यामुळे मुले आणि किशोरवयीन युजर्स सोशल मीडियाच्या वापराकडे अधिक आकर्षित होऊन त्याचे व्यसन लागण्याची शक्यता वाढली.

कॅलिफोर्नियातील फेडरल कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच मेटाचे माजी इंजिनिअरिंग डायरेक्टर अर्तुरो बेजार यांनी कंपनीविरोधात साक्ष दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या सुरक्षिततेपेक्षा कंपनीच्या व्यावसायिक हिताला अधिक महत्त्व दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर CEO मार्क झकरबर्ग यांना न्यायालयात साक्ष देण्याची वेळ येऊ नये, यासाठी मेटाने न्यायालयीन लढाईऐवजी तडजोडीचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले जात आहे.

‘Digital Bedtime’ अंतर्गत काय बदलणार?

या तडजोडीनंतर Instagram आणि Facebook च्या अल्पवयीन युजर्ससाठी वापराच्या पद्धतीत काही महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत.

रात्रीचा वापर बंद:
18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्ससाठी रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Instagram आणि Facebook बंद राहतील. या काळात फीड आणि Reels स्क्रोल करता येणार नाहीत.

दररोज दोन तासांची मर्यादा:
दोन्ही प्लॅटफॉर्मचा एकत्रित वापर अल्पवयीन युजर्ससाठी दररोज दोन तासांपर्यंत मर्यादित केला जाईल. निर्धारित वेळ पूर्ण झाल्यानंतर ॲप्स लॉक होतील. त्यानंतर पुन्हा वापर करण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असेल.

शाळेच्या वेळेत Push Notifications बंद:
सकाळी 8 ते दुपारी 3 या शाळेच्या वेळेत मुलांना Push Notifications पाठवण्यावर निर्बंध असतील. याशिवाय रात्री 10 ते सकाळी 7 या कालावधीत Notifications सायलेंट ठेवण्यात येतील.

Likes आणि Reactions लपवले जाणार:
मुलांमध्ये सोशल मीडियामुळे निर्माण होणारे मानसिक दडपण आणि इतरांशी तुलना करण्याची प्रवृत्ती कमी करण्यासाठी त्यांच्या पोस्टवरील Likes आणि Reactions ची संख्या इतर युजर्सना दिसणार नाही. तसेच Cosmetic Surgery आणि Beauty Filters वरही बंदी घालण्यात येणार आहे.

Infinite Scrolling वर नियंत्रण:
Reels किंवा अन्य कंटेंट सतत पाहण्याची सवय कमी करण्यासाठी दर 15 मिनिटांनी ‘Productive Pause’ देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

भारतातही असे नियम लागू होणार?

सध्या हे नियम अमेरिकेतील युजर्सपुरतेच मर्यादित असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, जगभरात बालहक्क, ऑनलाइन सुरक्षा आणि सोशल मीडिया वापराबाबत कठोर नियमांची मागणी वाढत असल्याने भविष्यात भारतातही अशा प्रकारच्या उपाययोजनांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतीय सरकार आणि सायबर कायद्यांच्या माध्यमातून मेटाला अल्पवयीनांसाठी ‘Digital Bedtime’सारखी व्यवस्था लागू करण्याबाबत निर्णय घ्यावा लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

 सोनं-चांदीच्या दरातील घसरण थांबली; २४ कॅरेट सोनं १,४९,१८० रुपये, चांदी २३५ रुपये प्रति ग्रॅम

सोनं-चांदीच्या दरातील घसरण थांबली; २४ कॅरेट सोनं १,४९,१८० रुपये, चांदी २३५ रुपये प्रति ग्रॅम

सोनं-चांदीच्या दरातील घसरणीला आज ब्रेक लागला आहे. १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्यासह चांदीचे आजचे दर जाणून घ्या.

Oct 05, 2026
मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत पुणे-सोलापूरमार्गे धावण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 16 तासांचा प्रवास, सहा दिवस सेवा आणि सात प्रस्तावित थांबे असतील.

Oct 04, 2026
लोहगड हत्या प्रकरणात ५,०५३ पानांची चार्जशीट; डिलीटेड चॅट्स, Google History अन् ‘माही’ अकाउंटमधून तपासाला नवे पुरावे

लोहगड हत्या प्रकरणात ५,०५३ पानांची चार्जशीट; डिलीटेड चॅट्स, Google History अन् ‘माही’ अकाउंटमधून तपासाला नवे पुरावे

लोहगड हत्या प्रकरणात ५,०५३ पानांची चार्जशीट दाखल. सिया, चेतन आणि रितेश आरोपी; डिलीटेड चॅट्स, Google History अन् फेक Instagram अकाउंटचे पुरावे समोर.

Sep 29, 2026
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र; लोहगडावर रचलेला कट पोलिस तपासात उघड

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र; लोहगडावर रचलेला कट पोलिस तपासात उघड

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल. लोहगडाची रेकी, बनावट Instagram अकाऊंट आणि अन्य बाबी तपासात समोर

Sep 20, 2026
उन्हाळ्याची सुट्टी मुलांसाठी ‘क्लासेस’पेक्षा अनुभवांची संधी ठरू द्या!

उन्हाळ्याची सुट्टी मुलांसाठी ‘क्लासेस’पेक्षा अनुभवांची संधी ठरू द्या!

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांना सतत क्लासेसमध्ये व्यस्त ठेवण्याचा काळ नव्हे. पालकांनी मुलांसोबत वेळ घालवून त्यांना अनुभव, मोकळा वेळ, सर्जनशीलता आणि जीवनकौशल्ये शिकण्याची संधी द्यावी.

Sep 09, 2026