आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल नाही; १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असताना आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात मात्र दर स्थिर राहिले आहेत. आज सराफा बाजार सुरू झाल्यानंतर सोनं आणि चांदीच्या किमतीत कोणतीही वाढ किंवा घट नोंदवण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्याच्या दरात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. २४ कॅरेट सोन्याचा १ तोळ्याचा दर १,४९,१८० रुपये इतका आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे १० तोळे खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १४,९१,८०० रुपये मोजावे लागतील.
२२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव
आज २२ कॅरेट सोन्याच्या १ तोळ्यासाठी १,३६,७५० रुपये द्यावे लागतील. तर २२ कॅरेट सोन्याचे १० तोळे खरेदी करण्यासाठी १३,६७,५०० रुपये खर्च येईल.
सोन्याचे दागिने प्रामुख्याने २२ कॅरेट सोन्यापासून तयार केले जातात. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा स्थिर दर महत्त्वाचा ठरू शकतो.
१८ कॅरेट सोन्याचे दर
१८ कॅरेट सोन्याच्या दरातही आज कोणताही बदल झालेला नाही. १ तोळा १८ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना १,११,८९० रुपये मोजावे लागतील. तर १० तोळे १८ कॅरेट सोन्याची खरेदी करण्यासाठी ११,१८,९०० रुपये खर्च करावे लागतील.
चांदीच्या दरातही बदल नाही
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही आज स्थिरता पाहायला मिळत आहे. आज १ ग्रॅम चांदीचा दर २३५ रुपये आहे. त्यानुसार १ किलो चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २,३५,००० रुपये मोजावे लागतील.
गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर आज सोनं आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नसल्याने ग्राहकांना सध्याच्या किमतीवर खरेदी करता येणार आहे. मात्र प्रत्यक्ष खरेदी करताना दागिन्यांची घडणावळ, जीएसटी आणि इतर लागू शुल्कामुळे अंतिम किंमत वेगळी असू शकते.