अनिता कापरे ने जीती मैराथन

Anita Yuvraj Kapre: गिरड्यांच्या अवघड घाटात अनिताताईची विजयाची बाजी

अनिता युवराज कापरे ने बुलढाणा अर्बन मैराथन में जीत हासिल की, जिसमें उन्होंने अपनी मानसिक और शारीरिक सामर्थ्य का प्रदर्शन किया।

By : देशोन्नति
Anita Yuvraj Kapre: गिरड्यांच्या अवघड घाटात अनिताताईची विजयाची बाजी

बुलडाणा (Anita Yuvraj Kapre) : तालुक्यातील मासरुळ येथील अनिता युवराज कापरे यांनी बुलढाणा अर्बन मॅरेथॉनच्या निमित्ताने दि. १ मार्च रोजी निसर्गरम्य गिरडा घाटात मानवी जिद्द आणि निसर्गाचे अनोखे दृंद पाहायला मिळाले. या स्पर्धेत मासरुळ येथील सौ अनिता युवराज कापरे यांनी केवळ धावण्याची शर्यत जिंकली नाही ,तर वाढत्या वयाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत ‘तरुण्यालाही लाजवेल’ अशी ऐतिहासिक बाजी मारली.

मॅरेथॉनचे मैदान आणि समोर गिरडा घाटाचे चढ-उतार… हा सामना ताकदीपेक्षा मानसिक खंबीतेचा होता. (Anita Yuvraj Kapre) अनिताताईंनी सुरूवातीपासूनच आपली ‘ पेस’ आणि जिद्द कायम राखत प्रतिस्पर्ध्यांना चकमा दिला आणि घाटातील वळणावळणाचे रस्ते म्हणजे जणु गुगली चेंडू होते, पण अनिताताईनी तिथे संयमी खेळी करत शेवटच्या टप्प्यात आपल्या वेगाचा ‘ गिअर ‘ बदलला आणि थेट फिनिशिंग लाईनवर ‘ फस्ट विनर ‘ चार झेंडा रोवला. तर अनिताताई कापरे चा हा विजय केवळ एका पदकापुरता मर्यादीत नाही. हा विजय एका विचारांचा आहे की जर ध्येय समोर असेल तर शरीराच्या मर्यादा कधीच अडथळा ठरु शकत नाही,तर तो थकलेले विचारामुळे हरतो हो. अनिता ताईंनी धावताना मागे सोडलेले प्रत्येक पाऊल हे सांगत होते की, जिद्द तर निसर्गाचा रौद्र घाटही फुलांच्या वाटे सारखा वाटुन लागतो.

यावेळी बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी, आ. संजय गायकवाड, आ. धिरज लिंगाडे, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ.सुकेशजी झंवर, चारिटेबल अध्यक्षा कोमलताई झंवर यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला. मी आयुष्यात अनेक मॅरेथॉन धावले, पण गिल्डा घाटातील हा अनुभव विवक्षित होता. निसर्गाच्या कुशीतुन वाट काढताना मिळणारा आनंद हा कोणत्याही ट्रॉफीपेक्षा मोठा आहे हा विजय माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे, असे (Anita Yuvraj Kapre) अनिता ताईंनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.

संबंधित सामग्री

गर्भलिंग निदान प्रकरणात ‘लाच’खोरीचा पर्दाफाश

गर्भलिंग निदान प्रकरणात ‘लाच’खोरीचा पर्दाफाश

Fetal Sex Determination Case: गर्भलिंग निदानाच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच कठोर कलमे टाळण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात १५ लाख रुपयांची लाच

Aug 30, 2026
भारताची विजयी सलामी; कर्णधार हरमनप्रीत विजयाचा शिल्पकार

भारताची विजयी सलामी; कर्णधार हरमनप्रीत विजयाचा शिल्पकार

Hockey World Cup 2026: लग दोन ऑलिम्पिक पदके जिंकलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करून भारताचा विजय

Aug 16, 2026
जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही: पोलिस अधिक्षक डॉ. लोढा

जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही: पोलिस अधिक्षक डॉ. लोढा

SP Dr. Lodha: हिंगोलीत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी गुरूवारी पहिला ‘गुन्ह्यांचा आढावा’ मॅरेथॉन बैठक घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे खपवणीवर नियंत्रण

Aug 13, 2026
भाजपचा 31 वर्षांचा मोडला विक्रम; बांकीपूर बालेकिल्ल्यातून  BJP चा दारुण पराभव

भाजपचा 31 वर्षांचा मोडला विक्रम; बांकीपूर बालेकिल्ल्यातून  BJP चा दारुण पराभव

Prashant Kishor: बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक, जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर (PK) यांनी 16,000 हून अधिक मतांच्या फरकाने बांकीपूर जिंकले, 31 वर्षांचा भाजपचा विक्रम मोडला

Aug 03, 2026