हॉकी विश्वचषक 2026

भारताची विजयी सलामी; कर्णधार हरमनप्रीत विजयाचा शिल्पकार

Hockey World Cup 2026: लग दोन ऑलिम्पिक पदके जिंकलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करून भारताचा विजय

भारताची विजयी सलामी; कर्णधार हरमनप्रीत विजयाचा शिल्पकार

Hockey World Cup 2026

ॲमस्टेलवीन/ नेदरलँड्स ( Hockey World Cup 2026) : सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने स्वातंत्र्यदिनी वेल्सला ३-१ ने पराभूत करून स्पर्धेत दमदार सुरुवात केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

ॲमस्टेलवीन येथील वॅग्नर हॉकी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सातव्या मिनिटाला सुमितने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तीन मिनिटांनंतर, कर्णधार हरमनप्रीत सिंगनेही पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून भारताची आघाडी २-० पर्यंत वाढवली. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस भारताने वेल्सवर मजबूत पकड मिळवली होती.

भारतीय संघाची दुसऱ्या क्वार्टरमध्ये आघाडी कायम
भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरमध्येही आपली २-० ची आघाडी कायम ठेवली.  (Hockey World Cup 2026) भारताने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवला आणि एक पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण तो अयशस्वी ठरला. वेल्सने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय बचावफळीने त्यांचे हल्ले परतवून लावत त्यांना गोल करण्याची कोणतीही संधी दिली नाही. मध्यंतरापर्यंत भारत २-० ने आघाडीवर होता.

तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचे वर्चस्व कायम
तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचे वर्चस्व कायम राहिले. संघाने वेल्सवर सतत दबाव कायम ठेवला आणि क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटांमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळवला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने ४२ व्या मिनिटाला पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून भारताची आघाडी ३-० अशी वाढवली. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस भारताने सामन्यावरील आपली पकड आणखी मजबूत केली होती.

भारतीय संघाचा शेवटच्या मिनिटांमध्ये विजय
चौथ्या क्वार्टरमध्ये वेल्सने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना ५३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण (Hockey World Cup 2026_ भारतीय बचावफळीने धोका टाळला. तथापि, सॅम वेल्शने ५५ व्या मिनिटाला गोल करून स्कोअर ३-१ असा केला. त्यानंतर वेल्सने दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय संघाने शेवटच्या मिनिटांमध्ये संयम राखला आणि त्यांना दुसरा गोल करण्यापासून रोखले. आणि भारताने सामना ३-१ ने जिंकला. हरमनप्रीत सिंगच्या दोन आणि सुमितच्या एका गोलने भारताला विश्वचषकात विजयी सुरुवात करून दिली.