Ramayan Movie

‘रामायण’चा पहिला अधिकृत गाणं ‘जय जय राम’ रिलीज; रणबीर कपूर-साई पल्लवीच्या नव्या पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा

४००० कोटींच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटातील पहिलं अधिकृत गाणं ‘जय जय राम’ रिलीज झालं आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या नव्या पोस्टरचीही चर्चा आहे.

‘रामायण’चा पहिला अधिकृत गाणं ‘जय जय राम’ रिलीज; रणबीर कपूर-साई पल्लवीच्या नव्या पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा

४००० कोटींच्या मेगा बजेटमधील चित्रपटाची उत्सुकता शिगेला; ए. आर. रहमान यांचं संगीत, अरिजीत सिंह-श्रेया घोषाल यांचा आवाज

गणेश चतुर्थीच्या पवित्र पर्वाचा मुहूर्त साधत बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांसाठी खास भेट दिली आहे. तब्बल ४००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होत असलेल्या या भव्य चित्रपटातील पहिलं अधिकृत गाणं ‘जय जय राम’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गाण्याच्या रिलीजसोबतच प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या भूमिकेतील रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचं नवं पोस्टरही जारी करण्यात आलं आहे. या पोस्टरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

‘रामायण’चं दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत. चित्रपटातील ‘जय जय राम’ या गाण्याला संगीत दिग्गज ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याचे शब्द डॉ. कुमार विश्वास यांनी लिहिले असून, प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह आणि श्रेया घोषाल यांनी आपल्या आवाजात ते साकारलं आहे. चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून गाणं प्रदर्शित झाल्याची माहिती देण्यात आली.

‘रामायण’मध्ये दिग्गज कलाकारांची फौज

४००० कोटी रुपयांच्या प्रचंड बजेटमुळे आधीपासूनच चर्चेत असलेल्या या सिनेमाची स्टारकास्टही तितकीच भव्य आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

रवि दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारत असून, अरुण गोविल राजा दशरथांच्या भूमिकेत झळकणार आहेत. दुसरीकडे, साऊथ सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे. तसेच रकुल प्रीत सिंह शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या मोठ्या स्टारकास्टमुळे चित्रपटाकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष लागलं आहे.

दोन भागांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा

‘रामायण’ हा मेगा बजेट प्रोजेक्ट दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. चित्रपटाचा पहिला भाग ६ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमागृहात दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर दुसरा भाग ऑक्टोबर २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

ए. आर. रहमान आणि हंस झिमर यांच्यावर संगीताची जबाबदारी

‘रामायण’च्या संगीताचीही सध्या मोठी चर्चा आहे. ऑस्कर विजेते हंस झिमर आणि ए. आर. रहमान यांनी या चित्रपटाच्या संगीतावर काम केलं आहे. त्यामुळे ‘जय जय राम’ रिलीज झाल्यानंतर चित्रपटातील इतर गाण्यांबाबतही प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’च्या ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलरनंतर निर्माण झालेली उत्सुकता आणि आता ‘जय जय राम’च्या रिलीजमुळे या बहुप्रतीक्षित चित्रपटाची चर्चा आणखी वाढली आहे.

संबंधित सामग्री

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून हरियाणा ACBने अटक केली. कुटुंबीयांनी मात्र रक्कम अधिकृत शुल्क असल्याचा दावा केला.

Sep 26, 2026
अभिजीत सावंतने सांगितला अरिजित सिंगच्या संघर्षाचा प्रवास; ‘तुम ही हो’ ठरला मोठा टर्निंग पॉइंट

अभिजीत सावंतने सांगितला अरिजित सिंगच्या संघर्षाचा प्रवास; ‘तुम ही हो’ ठरला मोठा टर्निंग पॉइंट

अभिजीत सावंतने अरिजित सिंगच्या संघर्षाचा प्रवास सांगितला. ‘तुम ही हो’ने अरिजितच्या कारकिर्दीला मोठे वळण दिल्याचे त्याने म्हटले.

Sep 26, 2026
माऊंट मेरी जत्रेत नशेत महिलेचा धिंगाणा; महिला पोलीस शिपाईच्या दंडाला चावा

माऊंट मेरी जत्रेत नशेत महिलेचा धिंगाणा; महिला पोलीस शिपाईच्या दंडाला चावा

माऊंट मेरी जत्रेदरम्यान वांद्र्यात पोलिसांशी हुज्जत घालताना महिलेने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या दंडाला चावा घेतला. निकी जसिंग्टोला अटक करण्यात आली.

Sep 23, 2026
दलित मित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील यांचा १२३ वा जयंती उत्सव उत्साहात संपन्न

दलित मित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील यांचा १२३ वा जयंती उत्सव उत्साहात संपन्न

चिखलीत दलित मित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील यांचा १२३ वा जयंती उत्सव उत्साहात संपन्न; मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सत्यशोधक कार्याचे स्मरण केले.

Sep 21, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराबद्दल ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा सत्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराबद्दल ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा सत्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराबद्दल ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Sep 07, 2026