Punyashlok Ahilyadevi Holkar Award

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराबद्दल ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा सत्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराबद्दल ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराबद्दल ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा सत्कार

Punyashlok Ahilyadevi Holkar Award

महाविकास आघाडीच्या वतीने गौरव; २५ वर्षांच्या सामाजिक कार्याची शासनाकडून दखल

चिखली : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी सन २०२३-२४ चा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड. सौ. वृषालीताई राहुल बोंद्रे यांचा महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या निवासस्थानी हा सत्कार सोहळा पार पडला.

यावेळी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान सुपेकर यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. वृषालीताई बोंद्रे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट देऊन त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

महिला सक्षमीकरण, दारूबंदी व व्यसनमुक्ती चळवळ, सामाजिक जनजागृती तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. गेल्या अनेक वर्षांपासून हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, अनुराधा व हिरकणी परिवाराच्या माध्यमातून त्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत.

महिलांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्याच्या क्षेत्रात सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा आणि त्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी केलेल्या कार्याची शासनाने दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. मात्र, बोंद्रे परिवारातील काही दुःखद घटनांमुळे वृषालीताईंना त्या वेळी पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहता आले नव्हते. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांच्या हस्ते त्यांनी पुरस्कार स्वीकारला.

२५ वर्षांची सामाजिक वाटचाल

महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मागील २५ वर्षांपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. गौरी सजावट स्पर्धा, महिला दिन, हळदी-कुंकू, मातृदिन, योग शिबिरे, दारूबंदी आणि व्यसनमुक्ती जनजागृती अशा उपक्रमांना महिलांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आपल्या सामाजिक कार्याची खरी प्रेरणा असल्याचे ॲड. वृषालीताई बोंद्रे यांनी यावेळी सांगितले.

“महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श समोर ठेवून महिलांसाठी काम करत आले आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात काम करत राहू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सत्कार सोहळ्याला काँग्रेस तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष लालाजी धोंडगे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ईश्वरराव इंगळे, माजी सभापती डॉ. संतोषराव वानखेडे, माजी सरपंच भाई प्रदीप आंभोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील सहकारी उपस्थित होते.

ॲड. वृषालीताई बोंद्रे यांच्या या सन्मानाबद्दल सामाजिक, राजकीय, महिला तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

संबंधित सामग्री

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026